मंदिरातील पैशांचं करायचं काय?, मराठा सेवा संघाचे संस्थापक म्हणतात,…
मराठा सेवा संघाची ही आजही भूमिका नाही. पंजाबराव देशमुख यांनी म्हटलं होतं, की सर्व मंदिर भटमुक्त व्हावी. सर्व मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करावं.
बुलढाणा : मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, मंदिरात संयोगीता राजे भोसले यांच्याशी गैरव्यवहार केला. पंढरपूरसारखे राज्यातील सर्व मंदिर भटमुक्त करावेत. बहुजन समाजातील मुला-मुलींना मंडल आयोगानुसार भरती करावेत. यामुळे पुराणोक्त आणि वेदोक्त वाद संपेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकापासून महाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणी हा वाद सुरू आहे. एकीकडे आपण सर्व हिंदू एक आहोत, असं सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने जयघोष करतो.
झालेला प्रकार निंदनीय
सावरकर यांनी असं म्हंटलं होतं की, सर्व हिंदू एक आहेत. इथं पुरोणोक्त आणि वेदोक्त असं काही नाही. संयोगीता राजे भोसले यांच्याबाबतीत घडलेला प्रकार निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला हे लाजीरवाणे आहे. हिंदू धर्मातील उतरंड आहे. वर्णिय, जातीय व्यवस्था आहे तिचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.
मंदिर भटमुक्त करण्याची वेळ
नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिता राजे भोसले यांच्यासोबत पुराणोक्त वेदोक्त मंत्रोपचाराचा प्रकार घडला. त्याचा निषेध मराठा सेवा संघाकडून करण्यात आला आहे. शिवाय आता मंदिरे भटमुक्त करण्याची वेळ आली आहे. असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलंय.
जीजाऊ ब्रिगेड करणार आंदोलन
मंदिरातील भट ब्राम्हणांच्या जागी आता बहुजन समाजातील मुला, मुलींची नियुक्ती करावी. अशी मागणी पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. त्यासाठी मराठा सेवा संघाची ब्रांच जीजाऊ ब्रिगेड राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे. अशी भूमिका पुरुषोत्तम खेडेकर यांनी जाहीर केली आहे. राज्याच्या राजकारणात आता नवीन वाद पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरावा
मराठा सेवा संघाची ही आजही भूमिका नाही. पंजाबराव देशमुख यांनी म्हटलं होतं, की सर्व मंदिर भटमुक्त व्हावी. सर्व मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करावं. तेथील पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासारख्या चांगल्या कामासाठी वापरावा, असंही पुरुषोत्तम खेडेकर यांचं म्हणणंय. महिलांच्या उन्नतीसाठी मंदिरातील पैसा वापरला जावा. कोल्हापूरचं मंदिर भटमुक्त व्हावं, यासाठी जीजाऊ ब्रिगेडने आंदोलन हाती घेतलं आहे. त्याची तीव्रता पुढच्या काही दिवसांत वाढू शकते, असा इशारा खेडेकर यांनी दिला.