अस्वलाच्या माहेरघरातील व्हिडीओ व्हायरल; ही अस्वल नमस्कार करते की, आणखी काही
हा ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर आहे. या परिसरातून नितीन श्रीवास्तव कारने कुटुंबीयांसोबत प्रवास करत आहेत. डाव्या बाजूने एक भलीमोठी अस्वल दिसते. ही अस्वल सुरुवातीला खाली मान टाकून जात आहे.
बुलढाणा : अजिंठा पर्वत रांगेत वसलेले बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या अभयारण्यात प्रामुख्याने अस्वलासाठी पोषक वातावरण असल्याने 500 पेक्षा जास्त अस्वलाची संख्या आहे. त्यामुळे नेहमीच अस्वल अभयारण्यासह परिसरात सहजासहजी नजरेस पडतात. असाच एक अस्वल दोन पायावर उभे राहून नमस्कार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुलढाण्याचे नितीन श्रीवास्तव यांनी हा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. नितीन श्रीवास्तव हे आपल्या कारने ज्ञानगंगा अभयारण्यातून प्रवास करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत. अशात त्यांना एक अस्वल दिसते. ही भलीमोठी अस्वल पाहून त्यांनी कारचा स्पीड कमी केला.
व्हिडीओत नेमकं काय?
हा ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर आहे. या परिसरातून नितीन श्रीवास्तव कारने कुटुंबीयांसोबत प्रवास करत आहेत. डाव्या बाजूने एक भलीमोठी अस्वल दिसते. ही अस्वल सुरुवातीला खाली मान टाकून जात आहे. ४०-५० फुटावरून सुरक्षित ठिकाणीहून श्रीवास्तव कुटुंबीय अस्वल पाहत आहेत. थोड्या वेळाने ही अस्वल उभी होते. जणूकाही समोरच्यांना नमस्कारचं करत आहे. तिचा दुसरा हेतूसुद्धा राहू शकतो. माझा पाठलाग करू नका, अशी ती चेतावणी देते की काय, असं वाटतं. त्यानंतर पुन्हा ती पुढं चालायला लागते. समोर रस्ता येतो. ती आधी रस्त्यावर जाते. त्यामुळे श्रीनिवास कुटुंबीय आपल्या कारचा वेग कमी करतात. आधी अस्वलाला जाऊ देतात. तिने रस्ता ओलांडल्यानंतर कार जाते. तोपर्यंत आणखी काही पर्यटक येतात.
ज्ञानगंगा अभयारण्यात ५०० पेक्षा जास्त अस्वली
या जंगलात मोठ्या प्रमाणात अस्वलं आहेत. त्यामुळे त्या बऱ्याच पर्यटकांना दिसतात. सुमारे ५०० पेक्षा जास्त अस्वल या अभयारण्यात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अस्वल दिसणं काही नवीन नाही. पण, या अस्वलाने दोन पायांवर उभं राहून नमस्कार केला की, आणखी काही, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे. त्यामुळे ही अस्वल आता चर्चेत आली आहे.