एक गाव, जगावेगळं! ऋषींची मूर्ती घडवायला गेले… बनला दशानन, रावणाला पूजणारं हे गाव कुठंय?
पूर्ण महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी रावणाला दहन होतं. .. पण महाराष्ट्रातील एकमेव सांगोळा या गावात रावणाची मनोभावे पूजा होते.
गणेश सोनोने, अकोलाः जनी वंद्य ते सर्व भावे करावे, जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे… हे कळतं अनेकांना पण वळतं मोजक्याच लोकांना… अवघ्या भारतात उद्या विजयादशमीला (Vijayadashami) श्रीरामांचा (Shriram) जयजयकार होतो. खलनायक म्हणून रावणाची हेटाळणी होते. पण अकोला जिल्ह्यातलं सांगोळा गाव त्याला अपवाद आहे. रावणाच्या (Ravan) सद्गुणांमुळे येथे रावनाची पूजा केली जाते…
वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे,अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे….दशानन रावणात अनेकदुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते…याच गुणांमुळे त्याची पूजा सांगोळ्यात केली जाते. अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या वाडेगाव जवळ सांगोडा गाव आहे…. पूर्वेला एका ओट्यावर रावणाची पुरातन दगडाची मूर्ती आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य आणि श्रद्धास्थानही आहे.
रावण कपटी,अहंकारी होता…अमर्याद भोग लालसा आणि महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्यात असुरी वृत्ती होती… पण रावणातील हे दुर्गूण बाजूला सारले तर त्याच्यातील गुणांचे दर्शन होते.
.हे रावणाचे मंदिर जिल्हातले नव्हे तर राज्यातले एकमेव असल्याचं म्हटलं जातं.
महापंडित रावणाची लंका नगरी अकोला पासून हजारो किलो मीटर दूर आहे. पण अकोला जिल्हातल्या सांगोड़ा या गावात महापंडित दशानन रावणाची नित्यनियमान पूजा केली जाते.
गेल्या 300 वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेला असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होतात.
ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका मूर्तीकाराला त्यांची मूर्ती बनविण्याचे काम सोपविण्यात आले. पण, त्याच्या हातून घडली ती दशाननरावणाची ही मूर्ती.
दहा तोंडं,काचा बसवलेले 20 डोळे, सर्व आयुध असलेले 20 हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली.
दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती, हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला. गावात लंकेश्वर स्थिरावले…..
पूर्ण महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी रावणाला दहन होतं. .. पण महाराष्ट्रातील एकमेव सांगोळा या गावात रावणाची मनोभावे पूजा होते.