“राज्यात गद्दारीची बीजे आधी कुणी पेरली?;” प्रतापराव जाधव यांनी नाव सांगितलं
शरद पवार यांनी गद्दारी करत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले.
बुलढाणा : महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी गद्दारीचे बीज शरद पवारांनी रोवले. असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सोडले. राष्ट्रवादीचे नेते आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी गद्दारीचे बीज शरद पवारांनी रोवली, अशी घणाघाती टीका बुलाढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलीय. शरद पवार यांनी गद्दारी करत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले. उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवार यांच्या विचारांचा एवढा पगडा होता की शरद पवार हे ब्रम्हदेव आहेत. ते जादूची कांडी फिरवून सर्व समस्यांचे निराकरण करतात. असं उद्धव ठाकरे यांना वाटत होतं.
मुख्यमंत्री ठाकरे, सत्ता पवारांच्या हाती
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मात्र सत्ता अजित पवार गाजवत होते. अशी चौफेर फटकेबाजी खासदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे.
बुलढाण्यात आमचा पालकमंत्री नव्हता
जाधव भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना प्रतापराव जाधव म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा त्यांना एवढा अभिमान आला की, घराच्या बाहेर ते कधी पडले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सत्ता गाजवत होते अजित पवार. बुलडाण्यात चार आमदार होते. पाचवा मी खासदार होतो. पण, पालकमंत्री म्हणून नेमण्यात आलं ते राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराला. सत्ता महाविकास आघाडीची असताना विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजवावी लागली.
आमची गद्दारी नव्हे उठाव
अनेक वेळी एकनाथ शिंदे यांना सांगायचो हे काही खरं नाही. पुढच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरोश्यावर निवडणुका जिंकू शकत नाही. समविचारी पक्षासोबतचं आपण गेलं पाहिजे. असे माझ्यासारखे अनेक लोकं शिंदे यांना सांगत होते. ५६ पैकी ४० आमदार, १८ पैकी १३ खासदार हे शिंदे यांच्या बाजूला आहेत. काही लोकं म्हणतात, यांनी गद्दारी नव्हती. हा आमचा उठाव होता, असंही प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केलं.