Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘’हा ग्रंथ धर्मरक्षक म्हणून घोषित करणार का?’’, अमोल मिटकरी यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा म्हणून मी येथे आलो आहे. जे बोलतो ती विचारधारा हीच आहे. म्हणून मी कुणासमोर माफी मागितली नाही.

‘’हा ग्रंथ धर्मरक्षक म्हणून घोषित करणार का?’’, अमोल मिटकरी यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 11:45 PM

बुलढाणा : शिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) उपस्थित होते. यावेळी बोलताना मिटकरी म्हणाले, समयाची जाण आणि बोलण्याचे भान मला आहे.  माझ्याकडून एक शब्द चुकीचा निघाला तर राज्य पेटले असता पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) हे मला म्हणाले होते. भिऊ नको मी तुझ्या सोबत आहे. कारण पाठीशी असणारे पळून जातात. खोटा इतिहास चित्रपट दाखवण्याचे काम करत आहेत. आपण 4 आमदार एकत्रित येऊन निधी देऊ.

देवेंद्र फडणवीस तुम्ही बुधभूषण ग्रंथ धर्मरक्षक म्हणून घोषित करणार का?, असा सवालही यावेळी अमोल मिटकरी यांनी विचारला. जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणता तर संभाजी महाराज यांनी लिहिलेला कुलभूषण ग्रंथ हा धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्याचं धाडस तुम्ही दाखविणार का. हे धाडस राज्यकर्त्यांमध्ये नसल्याचंही अमोल मिटकरी म्हणाले.

राजसत्ता मिळाली म्हणून

याच मातीत २००५ ला मी नतमस्तक झालो. याच मातीची प्रेरणा घेऊन मी आमदार झालो. हाच माईक विधिमंडळातून लंडनपर्यंत नेता आला. पुरुषोत्तम खेडेकर हे वेळोवेळी पाठिशी राहतात. धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, शिक्षणसत्ता आणि प्रचार-प्रसार माध्यम सत्ता या पाच सत्ता बहुजनांनी हस्तगत केल्या पाहिजे. मला राजसत्ता मिळाली म्हणून मी काही देऊ शकलो, असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

कुणासमोर झुकणार नाही

स्थानिक आमदार विकास निधीमधून २५ लाख रुपये घोषित करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा म्हणून मी येथे आलो आहे. जे बोलतो ती विचारधारा हीच आहे. म्हणून मी कुणासमोर माफी मागितली नाही. कुणासमोर झुकलो नाही. झुकणार नाही, असंही अमोल मिटकरी यांनी ठासून सांगितलं.

खोटा इतिहास दाखविण्याचं काम सुरू आहे. संभाजी ब्रिगेड हा शब्द ऐकला तरी समोरचे तसेच घायाळ होतात. ती चळवळ नव्या दमानं जिवंत राहिली पाहिजे. अशी अपेक्षा आहे.

कला द्यावी कलावंतांनी

मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो. धन द्यावे, धनवंतानी, गुण द्यावे गुणवंतानी. कला द्यवा कलावंतानी. बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी. १४ मे २०२० ला मी आमदार झालो होतो. त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका.
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी.
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.