Akola Bullock Cart Race | अकोला जिल्ह्यात काळ्या मातीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

Akola Bullock Cart Race | अकोला जिल्ह्यात काळ्या मातीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

| Updated on: Mar 05, 2022 | 4:10 PM

अकोला (Akola)  जिल्ह्यातील घुसर वाडी या गावात आज उत्साहाचे वातावरण होते. इथे शंकरपट आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या (Farmers) विरंगुळा सोबतच बैलांच्या (Bull) आरोग्याचा यामागे उद्देश असतो.

अकोला (Akola)  जिल्ह्यातील घुसर वाडी या गावात आज उत्साहाचे वातावरण होते. इथे शंकरपट आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या (Farmers) विरंगुळा सोबतच बैलांच्या (Bull) आरोग्याचा यामागे उद्देश असतो. ग्रामीण भागातल्या शेतीशी संबंधित अर्थकारणाला यामुळे चालना मिळते. बैलांची खरेदी-विक्री यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. पटात धावलेल्या बैलांना फार मोठी किंमत मिळते. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून 30 ते 40 हजार रुपयाला विकल्या जाणाऱ्या बैलांना 1 लाखाच्या वर किंमत मिळत असल्याने शंकरपट झालेच पाहिजे, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहेत. शंकरपटासारख्या कृषी संस्कृतीचे महत्त्व वाढवणाऱ्या परंपरा आणि क्रीडा प्रकारांना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळवून देणेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. यात बुलडाणा जिल्हातल्या चिखली तालुक्यातील वैरागड येथील गोविंदा मोरे यांच्या खिल्लारी बैल जोडीने 100 मीटर अंतर 6 सेकंड 8 पॉइंटमध्ये पार करत या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.