मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच गौतम अदानी फडणवीसांच्या भेटीला, कारण अद्याप गुलदस्त्यात
गौतम अदानी हे दुपारी १२.०० च्या सुमारास देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान सागर बंगल्यावर पोहोचले. यानंतर साधारण दीड तास गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली.
Gautam Adani Meet CM Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीनंतर आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेल असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. एकीकडे महाराष्ट्रातील राजकारणात मंत्रिमंडळाच्या हालचाली वेगात सुरु असताना दुसरीकडे एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. देशाच्या उद्योग क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव असलेले गौतम अदानी यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावरुन आता चर्चांना उधाण आले आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांनी नुकतंच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गौतम अदानी हे दुपारी १२.०० च्या सुमारास देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान सागर बंगल्यावर पोहोचले. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर पोहोचले. यानंतर साधारण दीड तास गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी गौतम अदानी यांनी राज्यातील उद्योग, विकासकामे याबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मेट्रो प्रकल्पांबद्दलही चर्चा करण्यात आल्याचे बोललं जात आहे.
तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गौतम अदानी हे त्यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही सदिच्छा भेट असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
गौतम अदानीवर फसवणुकीचा खटला
दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. हे कंत्राट मिळवून देण्यासाठी २५ कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आहेत. इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचे वृत्त दिलं होतं. मात्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सोलार एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी लाच देण्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आहे. दोन हजार दोनशे कोटींची लाच भारतीय अधिकाऱ्यांना देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. पैशांसाठी परदेशी गुंतवणूकदारांशी खोटं बोलल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे. तर अदानी ग्रीन एनर्जी आणि दुसऱ्या कंपनीशी संबंधित प्रकरण असून अमेरिकेच्या कोर्टात २४ ऑक्टोबर २०२४ ला केस दाखल करण्यात आ्ली आहे. दरम्यान, अमेरिकी गुंतवणूकदारांच्या पैशांची गुंतवणूक असल्यामुळे अमेरिकेत केस दाखल कऱण्यात आल्याची माहिती आहे.