राज्यातील 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रं सुरु करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राज्यातील जवळपास 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला आहे. त्यामुळे 1

राज्यातील 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रं सुरु करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
Mangal prabhat Lodha
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 6:56 PM

विनायक डावरूंग, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 1 जानेवारी 2023 : महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नववर्षांची भेट दिली आहे. मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या युती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहेत. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. याचा फायदा तरुणांना रोजगार मिळण्यास होणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्र असावे असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे ध्येय्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच देशात 511 कौशल्य विकास केंद्राचे एकाच वेळी उद्घाटन झाले. या कौशल्य विकास केंद्रांमार्फत गावातील नागरिकांना रोजगार मिळणार आहे. नवे कौशल्य शिकण्याची समान संधी मिळणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी गावातून शहराकडे होणार स्थलांतर कमी होण्यास मदत होणार आहे. आता नवीन 100 कौशल्य विकास केंद्रामुळे महाराष्ट्राती कौशल्यसंपन्न संपन्न तरुणाची पिढी तयार करणे शक्य होणार आहे. या केंद्रांद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांना असणार आहे. हे अभ्यासक्रम नॅशनल स्कील क्वालीफिकेशन फ्रेमवर्कशी ( National Skill Qualification Framework ) सुसंगत असतील. त्यासाठी केंद्र शासनातर्फे निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्म्स ( Common Cost Norms ) नुसार प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल.

तरुणांच्या जीवनात नवीन पहाट

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे देशातील युवकांच्या जीवनात नवी पहाट उगवेल. विकसित भारत घडवण्यासाठी या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. आपल्या तरुण पिढीला रोजगारक्षम बनवण्यासाठी तरुण पिढीला कौशल्य प्रशिक्षणाकडे वळवणे अतिशय महत्वाचे रहाणार आहे. त्यादृष्टीने कौशल्य केंद्रांचे निर्मिती करण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.