महापुरुषाच्या स्मारकासाठी जागा सूचवा, पालक मंत्र्याचे पहिल्यांदाच आवाहन

धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यातच राज्य सरकारच्यावतीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली आहे, मात्र संयोजन समितीने या स्मारकासाठी मुंबईतील जागा सुचवावी अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

महापुरुषाच्या स्मारकासाठी जागा सूचवा, पालक मंत्र्याचे पहिल्यांदाच आवाहन
cabinet minister Mangalprabhat lodhaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 5:02 PM

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 4 डिसेंबर 2022 : मुंबईत राज्य सरकार महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 248 व्या जन्मोत्सवाचे आयोजन पुण्यश्लोक फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येत्या 30 दिवसात संयोजन समितीने मुंबई शहरातील जागा मला सुचवावी, त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभे करण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन लोढा यांनी यावेळी दिले.

चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 248 वा जन्मोत्सव सोहळा मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी धनगर समाज हा प्रामाणिक समाज असून राज्य सरकार त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करीत आहे. या कार्यक्रमाच्या संयोजन समितीने येत्या 30 दिवसात मला मुंबई शहरातील जागा सुचवावी, त्याठिकाणी राज्य सरकारच्यावतीने महाराजा होळकर यांचे स्मारक उभे करण्याची मी जबाबदारी घेतो असे आश्वासन मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिले.

‘मुंबई आमचीच’ भाजपाचा नारा

मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकांसाठी भाजपाने कंबर कसली आहे. ‘मुंबई आमचीच’ असा नारा देत भाजप या निवडणूकांच्या रिंगणात उतरले आहे. या निवडणूका जिंकण्यासाठी ‘मुंबई आमचीच’ नावाचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून या निवडणूकांची रणनीती आखली जात आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठकांचा धडाका लावला आहे.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.