नाशिकमध्ये मद्यधुंद पोलिसांचा राडा, स्वत: गाडी ठोकून दुसऱ्या ड्रायव्हरला मारहाण

नाशिकमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत (Nashik police rada) असताना, दुसरीकडे दारु विक्रीवरुन प्रशासनामध्येच संभ्रम असल्याचं दिसतंय.

नाशिकमध्ये मद्यधुंद पोलिसांचा राडा, स्वत: गाडी ठोकून दुसऱ्या ड्रायव्हरला मारहाण
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 2:57 PM

नाशिक : नाशिकमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत (Nashik police rada) असताना, दुसरीकडे दारु विक्रीवरुन प्रशासनामध्येच संभ्रम असल्याचं दिसतंय. वाढत्या गर्दीमुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दारु दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानं उघडण्यास सांगितलं आहे. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये दुकानचालकांमध्ये संभ्रम आहे. (Nashik police rada)

एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास मद्यधुंद पोलिसांचा कारनामा समोर आला आहे. मद्यधुंद पोलिसांनी मध्यरात्री राडा केला. दारुच्या नशेत असलेल्या या पोलिसांनी लेखानगर भागात वाहनांना धडक दिली. भररस्त्यात ज्यांची वाहने ठोकली, त्याच नागरिकांना या पोलिसांनी मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत.

नाशिकमध्ये दारु दुकानांवरुन संभ्रम

नाशिकमध्ये चार मे रोजी वाईन शॉप सुरु करण्यात आले होते. मात्र वाईन शॉप-दारु दुकानांबाहेर रांगा वाढल्याने एकच गर्दी झाली.  त्यामुळे पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी दारु दुकानं बंद करण्याचे आदेश दिले. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानं सुरु करण्यास सांगितल्याने, प्रशासनात समन्वय आहे की नाही असा प्रश्न आहे.

नाशिकमध्ये 79 नवे रुग्ण, एकट्या मालेगावात बाधितांची संख्या 300 वर, तर जिल्ह्यात कोरोनाचे 463 रुग्ण 

नाशिकशहरात कोरोनाचा आकडा हा सातत्याने वाढतोय. काल एका दिवसात जिल्ह्यात 80 रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागरिकांची चिंता आता वाढू लागली आहे. शहरातील कॅनडा कॉर्नर परिसर आणि गंगापूर रोड परिसरात 2 रुग्ण आढळून आल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

Liquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश   

राज्यात दारुविक्री सुरु ठेवावी की बंद? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.