Snake Video : सांगलीच्या आटपाडी तालुक्यात आढळला दुर्मीळ पोवळा साप, जाणून घ्या ‘या’ सापाविषयी…

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील खंडोबामळा येथे दुर्मीळ जातीचा व विषारी पोवळा साप आढळला आहे. विभुते यांनी या सापाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

Snake Video : सांगलीच्या आटपाडी तालुक्यात आढळला दुर्मीळ पोवळा साप, जाणून घ्या 'या' सापाविषयी...
आटपाडी तालुक्यात आढळला दुर्मीळ पोवळा सापImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 4:55 PM

सांगली : सांगलीच्या (Sangali) आटपाडी (Aatpadi) तालुक्यातील माडगुळे (Madgule) येथील खंडोबामळा (Khandobamala) येथे दुर्मीळ जातीचा व विषारी पोवळा साप आढळला आहे. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे (Shrimant Babasaheb Deshmukh College) प्राणीशास्त्र विभागप्रमुख व सर्पतज्ज्ञ प्रा डॉ. शिवाजी विभुते (Shivaji Vibhute) यांच्या दृष्टीस हा साप पडला. या सापाचे इंग्रजी नाव स्लेंडर कोरल स्नेक (Castoes Coral Snake) म्हणजेच पोवळा साप आहे. याचे शास्त्रीय नाव कॅलोफिस मेल्यान्युरस आहे.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील खंडोबामळा येथे दुर्मीळ जातीचा व विषारी पोवळा साप आढळला आहे. विभुते यांनी या सापाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. हा अतिशय दुर्मिळ साप आहे. त्यामुळे आटपाडीत आढळेलेल्या या सापाला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

हा साप एकदम निमुळता आहे. तो 22 इंचापर्यंत लांब वाढतो. सापाचा रंग मातकट असून डोके काळे व डोक्यावर पांढरे ठिपके आहेत. शेपटीला दोन काळ्या रंगाच्या रिंगा आहेत. पोटाकडील बाजूस लालसर व शेपटीखाली निळसर राखाडी रंग आहे. या सापाला डिवचल्यास तो लक्ष डोक्याकडून विचलित करण्यासाठी शेपटीच विटोळे घालतो. या जातीच्या सापाची नोंद गुजरात , महाराष्ट्र , कर्नाटक , केरळ , तामिळनाडू , गोवा , पश्चिम बंगाल या राज्यात आणि बांगलादेश व श्रीलंका या देशात झालेली आहे. हा साप विषारी आहे. याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते.

विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे घातक मानले जाते. दगडाखाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष्य छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ इत्यादी आहे. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. याच्या बरोबर डोक्यावर भगवी जाड रेषा असते. हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका असा इशारा देत असतो.

काही दिवसांआधी असाच साप सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यातील तुळसगावात आढळला होता.

संबंधित बातम्या

Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “सर्वात चपळ शिकारी!”

Video : मिर्चीनंतर आता इडली आईस्क्रीम!, नेटकरी म्हणतात, “आमच्या आईस्क्रीमसोबत खेळणं बंद करा…”

गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पाळीव गाढव, सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होणाऱ्या ‘मॅक्स’ची गोष्ट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.