मध्य रेल्वेचा प्रवास केवळ सीएसएमटी ते अंबरनाथ, अंबरनाथ आणि कर्जत बंद…लांबपल्ल्याच्या गाड्या वळविल्या
अंबरनाथ आणि कर्जतपर्यंत लोकल वाहतूक संपूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे सायंकाळी कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली आहे.
मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकाती रेल रोको थांबायचे काही नाव घेत नाहीए…सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झालेला रेल रोको आता सायंकाळचा पिकअवर सुरु झाला तरी संपायचे नाव घेत नसल्याने सकाळी मुंबईत कामावर पोहचलेल्या चाकरमान्यांना सायंकाळी घरी जाताना प्रचंड हालअपेष्ठांना सामोरे जावे लागणार आहे. कारण बदलापूर स्थानकातील रेल रोकोमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतूक केवळ सीएसएमटी ते अंबरनाथपर्यंतच सुरु आहे. अंबरनाथ आणि कर्जतपर्यंत लोकल वाहतूक ठप्प झालेली आहे. त्यामुळे सायंकाळी कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने लांबपल्ल्याच्या दहा गाड्यांची आतापर्यंत कर्जत-पनवेल-ठाणे मार्गाने त्यांच्या पुढील गंतव्य स्थानकापर्यंत रवानगी केली आहे.तर अंबरनाथ ते खोपोली दरम्यानच्या 30 हून अधिक लोकल ट्रेन रद्द केल्या आहेत.
बदलापूर येथील एका शाळेत चिमुरडीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडल्याने बदलापूरात संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळी रेल रोको सुरु केला आहे. या रेल रोकोमुळे अंबरनाथ ते कर्जतची वाहतूक आठ ते नऊ तास होत आले तरी ठप्पच आहे या मार्गावर केवळ सीएसएमटी ते अंबरनाथ अशा लोकल ट्रेन सुरु आहेत. परंतू त्यांची संख्या कमी असल्याने लोकल ट्रेनला मोठी गर्दी उसळली आहे. कामावरुन घरी परताना प्रवाशांची परळ,दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे स्थानकांत प्रचंड गर्दी झालेली आहे. अंबरनाथ ते कर्जत जाणाऱ्या प्रवाशाचे तर मार्ग बंद असल्याने खाजगी वाहनांनी तसेच रिक्षा आणि इतर वाहनांना मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रिक्षांनी अवाच्या सवा दर आकारणे सुरु केलेले आहे. ओला आणि उबर सारख्या एप आधारित गाड्यांचे भाडे देखील प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनांनी चाकरमानी कर्जतच्या दिशेने निघालेले आहेत.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांचे ट्वीट येथे पाहा –
#WATCH | Mumbai, Maharashtra: Central Railway CPRO Dr Swapnil Nila says, “The Central Railways traffic was affected since 10:00 am today morning as the agitators have occupied the railway tracks at the Badlapur railway station…We have been able to run trains only from… pic.twitter.com/vjfMUhmUNy
— ANI (@ANI) August 20, 2024
अंबरनाथ ते कर्जत ठप्प
मध्य रेल्वेच्या ३० लोकल गाड्या अंबरनाथ ते खोपोली दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. १० लोकल गाड्या कर्जत -पनवेल -ठाणा अशा संबंधित गंतव्य स्थानकांना वळविण्यात आल्या आहेत. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कोयना एक्स्प्रेस रीरूट करून व्हाया कल्याण चालवण्यात आली आहे. तब्बल तीन तास बदलापुर स्थानकात कोयना एक्स्प्रेस थांबली होती. केवळ सीएसएमटी ते अंबरनाथ दरम्यान लोकल सुरळीत सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी म्हटले आहे. बदलापूर ते कर्जत लोकल सेवा पुढील सूचनामिळेपर्यंत निलंबित करण्यात आलेली आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत की लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोचहता यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.