पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळीसाठी 391 जादा ट्रेन, दररोज दीड लाख प्रवासी प्रवास करणार

| Updated on: Nov 08, 2023 | 7:51 PM

दिवाळी तोंडावर आली असून मुलांच्या शाळांना सुट्या लागल्याने जो तो आपल्या गावी जाण्याचे नियोजन करीत आहे. मध्य रेल्वेने पुण्यातून राज्याच्या विविध भागात तसेच देशाच्या विविध राज्यात जाण्यासाठी 391 दिवाळी विशेष चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळीसाठी 391 जादा ट्रेन, दररोज दीड लाख प्रवासी प्रवास करणार
trains
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

पुणे | 8 नोव्हेंबर 2023 : दिवाळीच्या सुट्टी निमित्त गावी जाणाऱ्या आणि पर्यटन करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पुणे रेल्वे स्थानकातून यंदा 391 हून अधिक ट्रेन सोडणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून दररोज दीड लाख प्रवासी रेल्वेतून प्रवास करणार असल्याचा अंदाज रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे विविध राज्यातून देशभरात या ट्रेन प्रवास करणाऱ्या आहेत. पुण्याहून उत्तर प्रदेश, झारखंड, रांची यासह विविध राज्यात ट्रेन धावणार आहेत. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, नागपूरसाठी या जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या ज्यादा तिकीट खिडक्या उघडल्या असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्या आहेत.

पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळीसाठी 391 हून अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत. या दिवाळी विशेष ट्रेनमधून दररोज दीड लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रासह देशभरात जाण्यासाठी या दिवाळी विशेष ट्रेन चालविण्यात आले आहे. पाच दिवसांच्या कालावधीत या ट्रेन चालविण्यात येणार आहेत. या ट्रेन उत्तरप्रदेश, झारखंड, रांचीसाठी चालविण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, नागपूरसाठी या जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. दिवाळी तोंडावर आली आहे. अशा वेळी एसटी महामंडळाने तिकीटाच्या दरात सरसकट 10 टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. खाजगी ट्रॅव्हल्स देखील सणासुदीत प्रचंड दरवाढ करतात. त्यामुळे प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.

अमरावती – पुणे स्पेशलच्या 186 फेऱ्या

अमरावती – पुणे स्पेशल एक्सप्रेसच्या 186 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या 10 नोव्हेंबर 2023 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान पुणे ते अमरावती 93 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी अमरावती ते पुणे अशा 11 नोव्हेंबर 2023 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान 93 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

02131 पुणे – जबलपुर सुपरफास्ट स्पेशल दर सोमवारी 27 नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येणार होती. ती आता 1 जानेवारी 2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे. 02132 जबलपूर – पुणे सुपरफास्ट स्पेशल पूर्वी 26 नोव्हेंबर पर्यंत चालविण्यात येणार होती ती आता 31 डिसेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे.

पुणे ते हटिया दरम्यान 10 अतिरिक्त उत्सव विशेष

02845 साप्ताहिक उत्सव विशेष दर शुक्रवारी दि.3 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर ( 5 ट्रिप ) दरम्यान पुणे येथून स. 10.45 वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी दु. 3.25 वाजता पोहोचेल.

02846 साप्ताहिक उत्सव विशेष दि. 1 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर ( 5 फेऱ्या) दर बुधवारी रा. 9.30 वाजता हटिया येथून सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी रा. 2.45 वाजता पोहोचेल.