Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांना तान्ह्या बाळासह रेल्वे प्रवास करता येणार, मध्य रेल्वेची या स्थानकांवर उपयुक्त सुविधा

सार्वजनिक गर्दीच्या ठीकाणांवर उदाहरण रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने अडचण होत होती. त्यासाठी मध्य रेल्वेनेही पुढाकार घेतलाय...

महिलांना तान्ह्या बाळासह रेल्वे प्रवास करता येणार, मध्य रेल्वेची या स्थानकांवर उपयुक्त सुविधा
baby feeding room on central railway railwayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 12:59 PM

मुंबई : महिलांना आपल्या तान्हुल्यासह रेल्वे प्रवास करतानाची होणारी अडचण पाहून मध्य रेल्वेने आपल्या लांबपलल्याच्या टर्मिनसवर स्तनपान कक्षांची सुविधा निर्माण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानकांनंतर आता मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, पनवेल, ठाणे आणि कल्याण सारख्या गर्दीच्या टर्मिनसवर मध्य रेल्वे स्तनपान कक्षांची उभारणी करणार आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणी मातांसाठी स्तनपान कक्षांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे.

एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल, परळ, दादर आणि नेहरुनगर बस स्थानकात मातांसाठी स्तनपान कक्षांची उभारणी केली आहे. आता त्याच धर्तीवक मध्य रेल्वेने लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या गर्दीच्या सीएसएमटी, पनवेल आणि ठाण्यात स्तनपान कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महिला मातांना आपल्या तान्हुल्यासह प्रवास करताना या स्तनपान कक्षांची मदत मिळणार आहे. हे स्तनपान कक्ष अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक असे असणार आहेत.

13 स्तनपान कक्षांची उभारणी

मध्य रेल्वेने लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या टर्मिनसवर एकूण 13 स्तनपान कक्षांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्थानकावर तीन, लोकमान्य टिळक टर्मिनसवर तीन, ठाण्यात दोन, कल्याण, पनवेल आणि लोणावळ्यात दोन असे एकूण 13 कक्ष (पॉड्स) बसवण्यात येणार आहेत. या स्तनपान कक्षांची सुविधा विनामूल्य असणार आहे. प्रवासादरम्यान महिलांना आपल्या तान्हुल्यांना सुरक्षितपणे स्तनपान करता यावे, यासाठी स्तनपान कक्षां उभारण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

एसटी बसस्थानकातही सुविधा

सार्वजनिक गर्दीच्या ठीकाणांवर उदाहरण रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने अडचणी होत आहेत. त्यामुळे राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने एसटी महामंडळाला एकूण 17 ठिकाणांवर ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचे आदेश दिले आहेत. या 17 हिरकणूी कक्षांपैकी एसटी महामंडळा्च्या पाच बस स्थानकापैकी मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर बस स्थानक या तीन बस स्थानकावर हिरकणी कक्षांची उभारणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.