Video: नाशिकमध्ये राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रगीतासाठी मालुंजकर हे इतर मान्यवरांसह स्टेजवर उपस्थित होते. राष्ट्रगीत सुरु असतानाच मालुंजकर अचानक स्टेजवरच कोसळले. त्यांच्यासह स्टेजवर उपस्थित असलेले सर्व जण यामुळे गोंधळले. तात्काळ मालुंजकर यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

Video: नाशिकमध्ये राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 7:46 PM

नाशिक : मृत्यू कधी कुठे आणि कुणाला कसा गाठेल याचा काही नेम नाही. याचा प्रत्यक्षात अनुभव देणारी धक्कादायक घटना नाशिक मध्ये घडली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने(Amrut Mahotsav of Independence ) नाशिक(Nashik) मध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत( national anthem ) सुरू असताना स्टेजवरच एका माजी सैनिकाचा(ex-serviceman) मृत्यू झाला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चंद्रभान मालुंजकर(Chandrabhan Malunjkar) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे.

नाशिकमधील संदीपगर येथील शाळेत कार्यक्रमादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने या शाळेत सोमवारी आझादी का अमृतन महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मांजुलकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. कार्यक्रमावेळी शाळेच्या परिसरात सकाळी 9 वाजता प्रभातफेरी काढण्यात आली होती. यात देखील ते सहभागी झाले होते.

राष्ट्रगीत सुरु असताना स्टेजवरच कोसळले

प्रभात फेरीनंतर शाळेच्या आवारात सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीतासाठी मालुंजकर हे इतर मान्यवरांसह स्टेजवर उपस्थित होते. राष्ट्रगीत सुरु असतानाच मालुंजकर अचानक स्टेजवरच कोसळले. त्यांच्यासह स्टेजवर उपस्थित असलेले सर्व जण यामुळे गोंधळले. तात्काळ मालुंजकर यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

राष्ट्रगीत सुरू असतानाच चंद्रभान मालुंजकर हे स्टेजवर कोसळले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

1962 च्या युद्धात सहभागी झाले होते

नाशिकचे रहिवासी असलेले चंद्रभान मालुंजकर 1962 च्या युद्धात सहभागी झाले होते. निवृत्तीनंतर मालुंजकर हे माजी सैनिक संघटनेत सक्रिय झाले. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सातपूर परिसरात नव तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 पुराच्या पाण्यातून काढली प्रेतयात्रा

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यातच सोलापुरात देखील धो धो पाऊस कोसळत आहे. मात्र याच पावसामुळे प्रशासनाची पोलखोल करणारा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोलापुरमधील(solapur) अक्कलकोट तालुक्यात पुराच्या पाण्यातून(flood waters) प्रेतयात्रा(Funeral ) काढण्यात आली आहे. पूल नसल्यामुळे येथील नागरिकांची मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुराच्या पाण्यातुनच नागरीकांना वाट काढावी लागतेय. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावातील हे विदारक दृष्य आहे. या गावात पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून अंतयात्रा काढली आहे. या प्रेत यात्रेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.