Chandrakant Patil : राज्यात सर्वच विषयांवर टाहो फोडण्याची वेळ, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल; कोल्हापुरातल्या पूरस्थितीच्या नियोजनाची मागणी
कोल्हापूर : टाहो मोर्चा फक्त पूरग्रस्तांसाठीच काढावा लागला नाही, तर राज्यात सर्वच विषयात टाहो फोडण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) केली. ते कोल्हापुरात बोलत होते. चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात भाजपाने कोल्हापुरात टाहो मोर्चा काढला. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला असून कोल्हापुरातील पूरस्थितीचे (Kolhapur flood) कोणतेही नियोजन करण्यात आलेले […]
कोल्हापूर : टाहो मोर्चा फक्त पूरग्रस्तांसाठीच काढावा लागला नाही, तर राज्यात सर्वच विषयात टाहो फोडण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) केली. ते कोल्हापुरात बोलत होते. चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात भाजपाने कोल्हापुरात टाहो मोर्चा काढला. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला असून कोल्हापुरातील पूरस्थितीचे (Kolhapur flood) कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे. कुंभार बांधवांना कुठे जागा देणार, चाऱ्याची काय व्यवस्था केली ते सांगा, असे म्हणत मागील वर्षाचे पैसे अजून पूरग्रस्तांना मिळाले नाहीत. प्रशासनाने नियोजन केले असेल तर त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे. कोल्हापुरातील दसरा चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे (Collector office) गेला.
‘तुटपुंजी मदत’
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, की टाहो फोडूनही सरकारला ऐकायला येत नाही. हसन मुश्रीफ म्हणतात जीएसटी मिळाला नाही. काल केंद्र सरकारने जीएसीचे पैसे दिले. त्यावर आता अजित पवार म्हणतात, की ते पैसे पेट्रोल-डिझेलवरच्या व्हॅटसाठी नाहीत. त्यांनी एकदाच काय ते ठरवावे, असे पाटील म्हणाले. पुराचेही तसेच आहे. मागील वर्षीच्या पुराची नुकसान भरपाई तुटपुंजी दिली गेली. तीदेखील सर्वांना मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला.
राज्य सरकारवर चंद्रकांत पाटलांचे आरोप
‘पाठपुरावा करणार’
आम्ही आता उद्यापासून भाजपाच्या कार्यालयात काउंटर सुरू करणार आहोत. मागील वर्षी ज्यांना तुटपुंजी मदत जाहीर झाली पण मिळाली नाही, त्यांनी आपली नावे नोंदवावीत. आम्ही त्यांची यादी करून त्याचा पाठपुरावा करणार. यावर्षी पूर येवू नये, मात्र आल्यास तयारी काय? यासंबंधीची श्वेतपत्रिका सरकारने येत्या दोन-तीन दिवसांत घोषित करावी. कुंभारांचे गणपती, गुरे, चारा, औषधे यांचे काय करणार आहात, असा सवाल करत एवढ्यावरच न थांबता हा विषय शेवटापर्यंत नेणार, असा निर्धार चंद्रकांत पाटलांनी केला. 103 टक्के पावसाचा अंदाज असून कोणतेही नियोजन जिल्हा प्रशासनाचे नाही. निधी द्यायलाही सरकार तयार नाही, असा आरोप यावेळी त्यांनी केला.