माढ्यातून लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये, चंदक्रांत पाटलांचा पवारांना टोला
शरद पवारांनी मला शिकवू नये," असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. (Chandrakant Patil Sharad Pawar lok sabha)
सांगली : “माढ्यातून लोकसभेची निवडणूक ( lok sabha election) लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरसुद्धा टीका केली. ते सांगलीत बोलत होते. (Chandrakant Patil criticizes Sharad Pawar on contesting lok sabha election)
“मला गाव सोडून जावं लागतं असं शरद पवार बोलले. पवारांना माढा मधून लढावं लागलं. मात्र पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडाव लागलं. पक्षा पेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शरद पवारांनी मला शिकवू नये
शरद पवार मुंबईत असताना त्यांना चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आज (14 फेब्रुवारी) प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी “महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं?” असं म्हणत शरद पवार मिश्किल हसले. तसेच, “ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू?”, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. त्यांच्या याच टिप्पणीचे उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी वरील उत्तर दिले.
सरकारने अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च केला
यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरसुद्धा टीका केली. “राज्यातील पैसा बंगल्यांचे नूतनीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च केला जात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसेच, कोरोनाकाळात तात्पुरती कोव्हिड सेंटर उभी केली गेली. यावेळी कोव्हिड सेंटर्समध्ये जेवणाच्या ताटांची किंमत जास्त होती. कोरोनामध्ये काय काय केलं?, हे आम्हाला माहित आहे,” असा गंभीर आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.
राजधानी मुंबई आता भिकारीमुक्त होणार! मुंबई पोलिसांची मोहीम https://t.co/tpU13xmRcT @MumbaiPolice @vishwasnp @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra #beggars #mumbaipolice #campaignagainstbeggars
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
इतर बातम्या :
महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलू, पवारांचे चंद्रकांतदादांना चिमटे, उत्तर फडणवीसांकडून
शरद पवारांवर टीका करण्याशिवाय पर्याय नाहीच; चंद्रकांत पाटलांची कबुली, म्हणाले….
शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!
(Chandrakant Patil criticizes Sharad Pawar on contesting lok sabha election)