शरद पवार यांची राज्यपाल कोश्यारींवर टीका, चंद्रकांत पाटील म्हणाले…

शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केलीय. त्याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय. पाहा...

शरद पवार यांची राज्यपाल कोश्यारींवर टीका, चंद्रकांत पाटील म्हणाले...
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 3:25 PM

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य ताजं असतानाचकोश्यारी यांनी काल पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. विरोधक त्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज या वादावर पुन्हा एकदा भाष्य केलंय. त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) उत्तर दिलंय.

शरद पवार यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वाक्यता नसते. शरद पवार बोलतात एक अन् करतात एक, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखावी. आधीचे राज्यपाल चांगले होते. आताचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात, असं म्हणत शरद पवार यांनी कोश्यारींच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका केली आहे. त्यालाच आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय.

कोश्यारी यांचं वक्तव्य काय?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते भाषण करत होते. भाषण सुरु होताच एका महिलेने उभं राहून राज्यपाल कोश्यारी यांचे भाषण थांबवलं.‘राज्यपालजी तुम्ही आम्हाला दिसत नाहीत‘ असं म्हणत आपली अडचण सांगितली. महिलेच्या बोलण्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला उत्तर दिलं. ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू…आप जैसा बोलोगी वैसा मैं करूंगा, बोलो!’ असं कोश्यारी म्हणाले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवारांना लोकांना हसवणारं बोलणं याची सवय लागली आहे. वाद निर्माण होतो पण असं होऊ नये, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.