कोल्हापूर : सकाळपासून अमरावतीतला पुतळा (Chatrapati Shivaji mahraj) आणि राजकारण चर्चेत आहे. त्यावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामाही झाला. पोलिसांनी भल्या पाहटे पुतळा काढल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राण आक्रमक झाल्याचे दिसून आले, मात्र अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता असताना पुतळा काढण्याचे आदेश दिले कुणी? यावरून आता सवाल उपस्थित होत आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी महापौरांवर सुद्ध शासनाचा दबाव असेल, मात्र विनादबाव त्यांनी हे काम केले असेल तर मला आश्चर्य वाटेल. ज्यांनी पुतळा काढला त्यांना महाराष्ट्र क्षमा करणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. राणा दाम्पत्याला सर्व ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
महापालिकेत सत्ता भाजपची, घोषणा शिवसेनेविरोधात
नवणीत राणा अमरावतीच्या खासदार होण्याआधी इथे शिवसेनेचे आनंद अडसूळ यांची जागा पक्की होती. येत्या लोकसभेतही सहाजिकच नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांचं आव्हान आहे. त्यामुळे उद्या लोकसभेला भाजपचा पाठिंबा मिळावा म्हणून हा राजकीय डावपेच आहे का? असा सवालही विचारण्यात येत आहे. शिवसेना अमरावतीत मुख्यप्रतिस्पर्धी राहिल्याने नवनीत राणा आणि रवी राणा सतत ठाकरे सरकारला टार्गेट करताना मागील दोन वर्षात दिसून आले. आता या पुतळ्याच्या राजकणावरून नवा वाद पेटला आहे.
महाविकास आघाडी सरकार खुनी सरकार
मविआ सरकार खुनी सरकार आहे अशी, घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या सरकारला एसटीला मोडीत काढायचं आहे. जे डेपो आहेत, ते विकण्याचा यांचा प्रयत्न असेल असा आरोपही त्यांनी केली आहे. कुणी अशा कधी जमीन लाटल्या नाही, हे सर्व जमीनी लाटण्यासाठी सुरू आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंची परंपरा जपा, लोकांवरचा अन्याय दूर करा, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी आहे. 70 ते 80 हजरांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर अन्याय सुरू आहे. गप्प बसू नका, बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला हे न आवडण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.