Chandrakant Patil : बाळासाहेबांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदूत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं” चंद्रकांत पाटलांचं खोचक ट्विट
आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना हिंदुत्वावरून डिवचंल आहे. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) चिरंजीवांनी साहेबांचं हिंदूत्व मिठी नदीत "बुडवून दाखवलं" असे खोचक ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किलं आहे.
मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून (Hindutva) जोरदार वाद पेटला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना झालेली अटक. हनुमान चालीसा पठणाचा वाद आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला या मुद्द्यांनी सध्या राजाच्याचे राजकारण ढवळून निघालं आहे. तर या अटकेवरून भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उडवली आहे. शिवसेना आता हनुमान चालासा वाचणेही का नको वाटू लागले, असा सवाल आता भाजपकडून करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हनुमान चालीसा आणि मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दाही तापला आहे. अशातच आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना हिंदुत्वावरून डिवचंल आहे. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) चिरंजीवांनी साहेबांचं हिंदूत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं” असे खोचक ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किलं आहे.
चंद्रकांत पाटलांचे ट्विट काय?
हनुमान चालीसा वाचण्यावरून हा वाद पेटला आहे. चंद्रकांत पाटील यांनीही यावरून शिवसेनेवर निशणा साधताना ट्विट केले आहे की, “उत्तम ! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं”!अशा आशयाचे ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
शिवसेनेवर जोरदार निशाणार
उत्तम ! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं”!
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 24, 2022
पुन्हा वार-पलटवार
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार वार पटलवार सुरू आहेत. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेने हिंदुत्व सोडले असल्याची भाजप नेते सतत करत आहेत. तर हिंदूत्व कुणा एकट्याचे नाही, आम्ही हिंदूत्व कधी सोडले नाही, आम्हाला आमचे हिंदूत्व भाजपसाठी सिद्ध करण्याची गरज नाही, शिवसेनेचा आत्मच हिंदूत्व आहे, असे शिवसेना नेते वारंवार सांगत असतात. आता राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा काढल्यापासून भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. त्यातूनच चंद्रकात पाटील यांनी हे ट्विट केले आहे. शिवसेनाही यावर जोरदार पलटवार करण्याची शक्यता आहे.
Nilesh Rane : रस्त्यावर सुरू केलेली लढाई आम्हीही रस्त्यावर संपवू, निलेश राणे यांचा आघाडीला इशारा