मलिकांच्या राजीनाम्यावरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह, चंद्रकांत पाटील म्हणतात राजीनामा द्या तर मुनगंटीवार म्हणतात…
एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटालांनी (Chandrakant Patil) मलिकांच्या राजीनाम्यासाठी दबाव बनवायला सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांननी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे.
मुंबई : नवाब मलिकाच्या (Nawab Malik) अटकेनंतर महाविकास आघाडीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. आता अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजपमध्येच (BJP)दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटालांनी (Chandrakant Patil) मलिकांच्या राजीनाम्यासाठी दबाव बनवायला सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांननी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. यावर न्यायाधीश पुराव्यानुसार योग्य निर्णय देतील. बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन विकत घेऊनही असा आव आणत आहेत की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे आहेत, अशी सडकून टीका मलिकांवर मुनगंटीवर यांनी केली आहे. तर यावरच बोलताना न्यायलयाच्या निर्णयानंतर राजीनाम्यावर बोलू असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
भाजपमध्ये दोन मतप्रवाह
मुनगंटीवरांनी न्यायलयाच्या निर्णयानंतर बोलू असे वक्तव्य केल्याने भाजपमधील दोन मतप्रवाह समोर आले आहेत. आम्ही राजकारणात आहे म्हणून राजीनामा आम्ही राजीनामा मागायचा का ? असा सवालही मुनगंटीवार यांनी विचारला आहे. त्यामुळे कुजबूज सुरू झाली आहे. तर दुसरीकडे. नवाब मलिक यांना ed ने अटक केलायंनातर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत.असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांची भूमिका काय?
एका पाठोपाठ एका मंत्र्यांच्या आत जाण्याने आणि महाविकास आघाडीती राजनामा सत्राने भाजप महाविकास आघाडीला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील एक मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी राजीनामा द्यावा लागला, एक आत आहेत, एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला, एका नेत्याचे अनधिकृत रिसॉर्ट आहे, एका मंत्र्याला दोन पत्नी आहेत. किती मोठी यादी आहे. काय चाललंय हे? कोलमडले आहे सगळं, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. मलिकांच्या खात्यासाठी राष्ट्रवादीकडून दोन नावं चर्चेत आहेत.
मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंकडून डुकराचा फोटो पोस्ट, म्हणतात पैहचान कौन?