गावावरून माघारी परतले तर घरात 20 फूट खोल खड्डा, महिलेला शिडी लावून काढलं बाहेर, नेमकं काय घडलं?
चंद्रपूर शहारामध्ये एक धक्कादायक घटना समोरल आली आहे. गावावरू माघारी आल्यावर घरात 20 फूट खोल खड्डा पडलेला होता , दरवाजा उघडताच महिला खड्ड्याच पडली नेमकं काय झालं? जाणून घ्या.
चंद्रपूर शहराच्या रय्यतवारी कॉलरी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कोळसा खाणी असलेल्या या भागातील शिवणकर यांच्या घरी वीस फूट खोल खड्डा पडलाय. घरातील मंडळी बाहेर गावाहून दोन दिवसानंतर घरी आल्यावर दरवाजा उघडताच घरातील महिला थेट 20 फूट खड्ड्यातच पडली. घरात असं काय झालं की महिल दरवाजा उघडताच थेट खड्ड्यात पडली.
अचानक झालेल्या या प्रकारानंतर स्थानिकांच्या मदतीने शिडीचा वापर करून या महिलेला कसेबसे बाहेर काढले गेले. गेले दहा दिवस चंद्रपूर शहर जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भुभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेली दहा दिवस चंद्रपूर शहर -जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी आणि कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भुभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अधिकारी पोचले घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
पोलीस आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. घटनेचा अधिक तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक शहरात 26 ऑगस्ट 2022 रोजी आमराई वार्डात अशाच प्रकारे एक घर अशाच घटनेत तब्बल 70 फूट खाली खचले होते. कोळसा काढून पोकळ झालेला भूभाग सुयोग्य पद्धतीने पुन्हा रेती भरून बुजविल्या न गेल्याने अशा पद्धतीने भूभागात खड्डे पडण्याचे प्रकार होत असतात. आता वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडचे तज्ञ यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.