Video | स्थानिकांना रोजगार द्या म्हणत मनसेचा राडा; गाड्या, जेसीबी, CCTV ची तोडफोड

स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून मनसेने तोडफोड केली. (chandrapur MNS GRN construction company)

Video | स्थानिकांना रोजगार द्या म्हणत मनसेचा राडा; गाड्या, जेसीबी, CCTV ची तोडफोड
मनसे कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे तोडफोड केली.
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 3:37 PM

चंद्रपूर : सरकारी कोळसा कंपनी WCL अंतर्गत काम करणाऱ्या GRN कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात मनसेने आज (17 फेब्रुवारी) तोडफोड केली. स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून ही तोडफोड करण्यात आली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीआरएन कार्यालयातील सामानाची मोडतोड करत कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, CCTV सह वाहनांची नासधूस केल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अनेकदा निवेदन दिले, मात्र कार्यवाही नाही

मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कोळसा कंपनी WCL च्या भटाळी क्षेत्रांतर्गत GRN ही कंस्ट्रक्शन कंपनी कोळसा खोदण्याचे  काम करते. या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कामगारांनी तसेच या भागातील नागरिकांनी केला होता. या मुद्द्यावरुन मनसेने जीआरएन कंस्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा चौकशी केली. त्यासाठी अनेकदा निवेदनही दिले. मात्र, जीआरएन या कंपनीच्या प्रशासनाने मनसे तसेच स्थानिकांच्या मागणीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी मनसेने तोडफोडीचा आक्रमक पवित्रा धारण केला.

मनसेने केलेल्या तोडफोडीचा व्हिडीओ :

यावेळी मनसेने जीआरएन कंपनीच्या कार्यलयात जाऊन येथील सामानाची तोडफोड केली. तसचे वाहनांची, येथील सीसीटीव्हींची नासधूस केल्यामुळे येथे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड करताच घटनास्थळी पोलीस पोहोचले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्यानंतर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, यानंतरही जीआरएन कंपनीने स्थानिकांना रोजगाराची संधी न दिल्यास ही कंपनी चालू न देण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

इतर बातम्या :

VIDEO | फास्टॅगवरुन मनसे नेत्या रुपाली पाटील यांची किणी टोल नाक्यावर वादावादी

तळेगावातील सोमाटणे टोलनाक्याला विरोध, स्थानिक ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंचा म्हैसकरांना फोन

Video | “योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.