Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rare Gold Coin Of Lord Rama | एका हातात धनुष्य, दुसऱ्या हातात बाण, 12 व्या शतकातील श्रीरामांचे दुर्मिळ सोन्याचे नाणे

12 व्या शतकातील श्रीराम प्रभूंचे सोन्याचे नाणे पुढे आणले आहे. साकंबरी चहमान राजवंशाच्या विग्रहराज-4 या राजाच्या कार्यकाळात हे सोन्याचे नाणे घडवण्यात आले होते.

Rare Gold Coin Of Lord Rama | एका हातात धनुष्य, दुसऱ्या हातात बाण, 12 व्या शतकातील श्रीरामांचे दुर्मिळ सोन्याचे नाणे
Follow us
| Updated on: Aug 04, 2020 | 10:49 PM

मुंबई : 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे (Rare Gold Coin Of Lord Rama). भूमिपूजनाच्या निमित्ताने देशभर रामनामाचा गजर होतो आहे. यादरम्यान, चंद्रपूरचे इतिहास संशोधक ठाकूर यांनी मौल्यवान खजिना उपलब्ध केला आहे. त्यांनी 12 व्या शतकातील श्रीराम प्रभूंचे सोन्याचे नाणे पुढे आणले आहे. साकंबरी चहमान राजवंशाच्या विग्रहराज-4 या राजाच्या कार्यकाळात हे सोन्याचे नाणे घडवण्यात आले होते. भारतात अशी दोनच नाणी असल्याचा दावा करण्यात आला आहे (Rare Gold Coin Of Lord Rama).

अयोध्येत श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी होत आहे. तमाम देशवासीयांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. यानिमित्त चंद्रपुरातील इतिहासाचे अभ्यासक आणि दुर्मिळ नाण्यांचे संग्राहक अशोकसिंह ठाकूर यांनी अत्यंत दुर्मिळ असे बाराव्या शतकातील सुवर्ण नाणे जनतेसमोर आणले आहे. भारतात अशी केवळ दोनच नाणी असून, त्यातील हे एक असल्याचा दावाही ठाकूर यांनी केला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

5 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण हिंदूबांधवांसाठी आणि रामभक्तांसाठी सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखाच आहे. तब्बल 492 वर्षांच्या संघर्षानंतर त्याच ठिकाणी श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम चंद्र अंकित असलेली बाराव्या शतकात निर्माण करण्यात आलेली सुवर्णमुद्रा ठाकूर यांनी सर्वांसमोर आणली. हे सुवर्ण नाणे बाराव्या शतकात साकंबरी (शांबर) चहमान या राजवंशाच्या विग्रहराज-4 (सध्याचे राजस्थानमधील अजमेर)  या राजाच्या कार्यकाळात घडवण्यात आले होते. त्यांनी 1153 ते 1163 या कालावधीत राज्य केले (Rare Gold Coin Of Lord Rama).

या सुवर्ण नाण्याचे वजन 4.02 ग्रॅम आहे. नाण्यावर एका बाजूने प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा अंकित असून, त्यांच्या एका हातात धनुष्य आणि दुसऱ्या हातात बाण अंकित केला आहे. सोबतच ‘श्री राम’, असे लिहिले आहे. या प्रतिमेला फुलांची सजावट केली असून, कमळाची फुले अंकित आहेत. सोबतच हंस पक्षीदेखील आहे. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला देवनागरी भाषेत तीन ओळी अंकित आहेत.

हे नाणे उत्तम अवस्थेत असून, अतिशय दुर्मिळ आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनावरील जुन्या नाण्यांपैकी केवळ त्यांची प्रतिमा अंकित असलेले हे नाणे आहे. प्राचीन काळी भारतातील मंदिरामध्ये त्या प्रकारे शिल्पकलेचा वापर केला जायचा, तसाच वापर या नाण्यासाठी करण्यात आला आहे.

Rare Gold Coin Of Lord Rama

संबंधित बातम्या :

Ayodhya Ram Mandir | अयोध्यानगरी सजली, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी

राम मंदिरासाठी 1 कोटी रुपये आले, कुणी पाठवले माहिती नाही, त्यावर नाव शिवसेना : राम मंदिर ट्रस्ट

माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?.
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या.
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका.
'ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाही...', राणेंची जळजळीत टीका
'ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाही...', राणेंची जळजळीत टीका.
भगवी साडी, गळ्यात रुद्राक्ष माळ, पंकजा मुंडेंचं कुंभमेळ्यात शाहीस्नान
भगवी साडी, गळ्यात रुद्राक्ष माळ, पंकजा मुंडेंचं कुंभमेळ्यात शाहीस्नान.
गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, ठाकरे गट त्या आरोपांनंतर आक्रमक
गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, ठाकरे गट त्या आरोपांनंतर आक्रमक.
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करतात? पुढील 6 दिवस कसारा घाट बंद
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करतात? पुढील 6 दिवस कसारा घाट बंद.
'गोऱ्हे निर्लज्ज बाई, पक्षातून चारदा आमदार पण जाताना घाण..',राऊत भडकले
'गोऱ्हे निर्लज्ज बाई, पक्षातून चारदा आमदार पण जाताना घाण..',राऊत भडकले.
गोऱ्हे ताईंना तिकीसाठी मी इतके पैसे.., ठाकरेंच्या नेत्याचा मोठा खुलासा
गोऱ्हे ताईंना तिकीसाठी मी इतके पैसे.., ठाकरेंच्या नेत्याचा मोठा खुलासा.
ताठ होती माना..., शिवरायांच्या 12 किल्ल्यांना 'वर्ल्ड हेरिटेज' नामांकन
ताठ होती माना..., शिवरायांच्या 12 किल्ल्यांना 'वर्ल्ड हेरिटेज' नामांकन.