ऊर्जामंत्र्याचे अपयश झाकण्यासाठी चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवत आहे, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ऊर्जामंत्र्याचे अपयश झाकण्यासाठी चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 1:29 AM

नागपूर : स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवत आहे. तसेच जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते मंगळवारी (2 मार्च) नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते (Chandrashekhar Bawankule criticize Nitin Raut and MVA Government over Black out and China).

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “12 ऑक्टोबर 2020 रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत चीनच्या सायबर हल्ल्याचे कारण दिले आणि जनतेची दिशाभूल करणे सुरू केले. एका वृत्ताच्या आधारावर एखादा आयपीएस अधिकारी अहवाल तयार करतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप असल्याचं नमूद करतात. अशा महत्त्वाच्या अहवालाची कोणतीही खातरजमा न करता राज्याचे गृहमंत्री थेट पत्रकार परिषद घेऊन आपली जबाबदारी झटकताहेत हे अत्यंत गंभीर आहे.”

“या घटनेत एखाद्या देशाचा संबंध असेल तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही?”

“जर या घटनेत एखाद्या देशाचा संबंध असेल तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही? परराष्ट्र खाते आणि संरक्षण खात्यासमोर हा विषय मांडणे राज्य सरकारला महत्त्वाचे वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते. 12 ऑक्टोबरपूर्वी मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या 4 वाहिन्यांपैकी 2 वाहिन्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे सगळा भार हा कळवा-पडघा या तिसऱ्या वाहिनीवर येऊन ती वाहिनी 12 ऑक्टोबरला सकाळी बंद पडली. त्यानंतर चौथी वाहिनी ही खारघर येथील ऑपरेटर्सकडून स्वत:हून बंद करण्यात आली,” असंही बावनकुळे यांनी नमूद केले.

‘जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चीनवर सायबर हल्ल्याचा आरोप’

“अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दुरूस्तीचे काम केले नाही, समन्वयाचा अभाव असल्यामुळे मुंबई काळोखात बुडाली हे सत्य आहे. जनतेला 100 युनिटपर्यंतची मोफत वीज देण्याचं आश्वासन पूर्ण न करणे, भरमसाठ वीज बिल रद्द करण्याचे आश्वासन पूर्ण न करणे, कनेक्शन खंडित करण्याच्या नोटिसांमुळे संतप्त झालेली जनता यातून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चीनवर सायबर हल्ल्याचा आरोप करून जनतेची फसवणूक करून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न महाविकासआघाडी सरकारकडून होत आहे,” असाही आरोप बावनकुळे यांनी केला. तसेच याचा तीव्र निषेध करतो असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

गेल्यावर्षी मुंबई अंधारात का गेली? कुणी घातली? कोडं उलगडलं, न्यूयॉर्क टाईम्सचं सविस्तर वृत्त

Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

व्हिडीओ पाहा :

Chandrashekhar Bawankule criticize Nitin Raut and MVA Government over Black out and China

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.