मोठी बातमी ! भाजप मनसेला टाळी द्यायला तयार?, भाजपचा बडा नेता म्हणाला, राज ठाकरे यांनी प्रस्ताव दिला तर…

राज ठाकरेंनी काय निंर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. कुणी पक्षात येण्यासाठी उत्सूक असेल, उद्या तुम्ही म्हटलं पक्षात येतो तर मी नाही म्हणणार नाही, असं वक्तव्य भाजप नेत्याने केलंय.

मोठी बातमी ! भाजप मनसेला टाळी द्यायला तयार?, भाजपचा बडा नेता म्हणाला, राज ठाकरे यांनी प्रस्ताव दिला तर...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 2:05 PM

गजानन उमाटे, नागपूर | राज्यात नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प (Maharashtra Budget), आगामी महापालिका विधानसभा निवडणुका (Elections) आणि सुप्रीम कोर्टात सुरु असलेला सत्तासंघर्ष या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी स्थित्यंतरं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांची काल महत्त्वाची बैठक पार पडली. तर राज ठाकरे यांनीदेखील मनसेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांसमोर अधिक स्पष्ट भूमिका मांडली. विधानसभेत पुरेसं संख्याबळ नसलं तरी मुंबई महापालिका आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मनसेचा प्रभाव वाढताना दिसतोय. त्यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमधील वाद अधिक चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसे कुणासोबत जाणार, याची उत्कंठा वाढली आहे. मनसेकडून तसा प्रस्ताव आल्यास भाजपाला कुणाचेही वावडे नाही, असं वक्तव्य एका बड्या नेत्याने केलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बोलताना ही भूमिका मांडली.

काय म्हणाले बावनकुळे?

राज ठाकरे भाजपाला पाठिंबा देणार का, या प्रश्नावरून बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ राज ठाकरेंनी काय निंर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. कुणी पक्षात येण्यासाठी उत्सूक असेल, उद्या तुम्ही म्हटलं पक्षात येतो तर मी नाही म्हणणार नाही. आम्ही सन्यासी नाहीत. पक्षसंघटना आम्ही वाढवणारंच. पक्ष संघटना शेवटच्या माणसापर्यंत आम्ही पोहोचवणार. त्यामुळे आमच्याकडे ते येतील त्यांना आम्ही घेऊच. आजच्या तारखेपर्यंत राज ठाकरे यांच्याकडून युतीचा प्रस्ताव आला नाही. पण तसा प्रस्ताव आला तर निश्चित चर्चा करू…

संताजी-धनाजीची जोडी

तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोडी ही धनाजी-संताजीची जोडी आहे, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ शिंदे फडणवीस जोडी धनाजी संताजी ची जोडी आहे. दमदार काम करत आहे.सकाळी 7 ते रात्री 1 पर्यंत काम करण्याचे आमचे संस्कार आहेत. उध्दव ठाकरे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले त्यांनी आम्हाला सांगू नये.- अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मागल्या सरकार पेक्षा आमचं सरकार दुपटीने मदत करेल, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलंय.

संजय राऊतांना प्रत्युत्तर

चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलंय. महाराष्ट्रातलं सरकार कोसळणार असल्याने फडणवीस यांनी त्यांचं शेवटचं बजेट मांडलं, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती. तसेच चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतरच भाजपचे वाईट दिवस सुरु झाल्याची टीका त्यांनी केली. त्यांना उत्तरात बावनकुळे म्हणाले, ‘ त्यांचे सरकार गेलंय, आमचं सर सरकार येऊन सहा महिने झालेत. मी अध्यक्ष झाल्यावर 7731 ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. 3003 सरपंच भाजपचे निवडून आलेत. कसब्यात जेवढी मतं गेल्या चार निवडणूकीत मतं मिळाले तेवढेच मतं मिळाले. विजयासाठी चार टक्के मतं कमी मिळाले. आम्ही आमची ताकद वाढवतोय. 2024 ला स्वतः संजय राऊत आमचं अभिनंदन करतील. सध्या – पक्ष वाढवण्यासाठी त्यांना बोलावं लागतंय . येत्या १४ मार्चला ठाकरे गटाचे नेते आमच्याकडे येतील तेव्हा त्यांना कळेल, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.