मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही – राहुल गांधींना कोणी सुनावलं ?
निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण मोदी जींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावं असं भाजप नेत्याने राहुल गांधींना सुनावलं.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून राजकीय प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही जोरात सुरू आहे. सोलापुरमधील सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं एक वक्तव्य भाजप नेत्यांना चांगलंच झोंबलं असून त्यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सोलापूरमधूील सभेत राहुल गांधी यांच्याकडून कथितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी मोदींवर कडाडून हल्ला चढवत टीकाही केली होती. मात्र त्यांचं वक्तव्य भाजप नेत्यांना रुचलं नसून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं. औकातीत रहा असंही बावनकुळे यांनी राहल यांना सुनावलं. ‘ निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावं’ असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांचं ट्विट त्यांच्या शब्दात जसंच्या तसं..
सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला.
निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही. अशा शब्दात बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.
सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते @RahulGandhi मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी… pic.twitter.com/WbteZuanCx
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 26, 2024