चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार?, पोलीस उपायुक्तांनी थेट नावच घेतलं; म्हणाले, त्या रात्री…

या घटनेनंतर अर्जुन आणि रोनित या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे. त्या दोघांचेही ब्लड सॅम्पल तपासासाठी पाठवले आहे, याबद्दल नागपूर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माहिती दिली.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार?, पोलीस उपायुक्तांनी थेट नावच घेतलं; म्हणाले, त्या रात्री...
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 1:02 PM

Nagpur Accident Police Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता नागपुरात अशाप्रकारचे एक हिट अँड रनची घटना घडली आहे. नागपुरात एका भरधाव वेगाने आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या ऑडी कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आता याप्रकरणी नागपूर पोलिसांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

नागपुरातील हिट अँड रन घटनेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पोलिसांनी आतापर्यंत या घटनेचा तपास कसा सुरु आहे, याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ तारखेला रात्री अपघात झाला. यानंतर अर्जुन हावरे, रोनित चित्तमवार, संकेत बावनकुळे यांना काल चौकशीसाठी तिघांनाही बोलवलं होतं. या तिघांचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा जामीनावर त्याची सुटका करण्यात आली.

दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे समोर

संकेत हा ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर बसलेला होता. या घटनेनंतर आम्ही चौकशीला सुरुवात केली आहे. अर्जुन हावरे हा यावेळी कार चालवत होता. त्याच्या बाजूच्या सीटवर संकेत बावनकुळे हा बसला होता. तर रोनित चित्तमवार हा मागच्या सीटवर बसला होता. हे तिघेही एका हॉटेलमध्ये जेवल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी घरी जाताना वाटेत हा अपघात घडला. या घटनेनंतर संकेत बावनकुळे हा घटनास्थळी आढळून आला नाही. तर या घटनेवेळी अर्जुन हावरेने नशा केलेली होती. डॉक्टरने याबद्दल पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. त्याचे ब्लड सॅम्पलही पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर अर्जुन आणि रोनित या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे.. त्या दोघांचेही ब्लड सॅम्पल तपासासाठी पाठवले आहे.

या घटनेवेळी गाडीचा वेग किती होता, काय याची आम्हाला कल्पना नाही. आम्ही RTO आणि ऑडीच्या काही एक्सपोर्ट लोकांना बोलवून याचा तपास करु. याप्रकरणी फक्त अर्जुनवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोनित किंवा संकेत या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नागपूर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.

नेमकं कारण काय?

सोमवारी रात्री साडेबारा वाजता नागपुरात अपघात घडला. काचीपुरापासून ते लोकमत चौकादरम्यान ही दुर्घटना घडली. आरोपानुसार अपघातावेळी ऑडी कारचा वेग ताशी 150 किमी होता. आधी कारनं एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर एका कारला आणि परत एका तिसऱ्या कारला याच ऑडी कारनं धडक दिली. काही मीटर अंतरावर एकच कार 3 वाहनांना धडक दिली. यावरुन कारचालकानं प्रमाणाबाहेर मद्यप्राशन केल्याचं बोललं जातं आहे. जेव्हा कारचा अपघात झाला, तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत हा देखील गाडीत होता. तो गाडीतील ड्राईव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर बसला होता.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.