अहमदनगरचं नामांतर करा; भुषणसिंह होळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

भुषणसिंह होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अहमदनगरला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. | Ahmednagar name

अहमदनगरचं नामांतर करा; भुषणसिंह होळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 12:04 PM

कोल्हापूर: राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा (Aurgabad) मुद्दा गाजत असतानाच आणखी एका शहराच्या नामांतराची मागणी करण्यात आली आहे. अहमदनगरचे नामांतर करुन शहराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होळकर घराण्याच्या वंशजांनी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. (Change Ahmednagar name demand by Ahilyadevi holkar descendants)

भुषणसिंह होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अहमदनगरला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

काही दिवसांपूर्वी होळकर घराण्याच्या वंशजांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. वाफगावच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर लगेचच अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात अहमदनगरच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहेत.

होळकर घराण्याने शरद पवार यांच्यावर काय टीका केली होती?

जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. त्यावरुन निर्माण झालेल्या वादावेळी होळकर घराण्याच्या वंशजांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून शरद पवार यांच्याकडून राजकारण होत आहे. छत्रपती घराणे सर्व समाजाचे भल्याचा विचार करणारे असल्याने छत्रपती संभाजी राजेंना या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती भूषण राजे होळकर यांनी केली होती.

अशा मागण्या होतच असतात: संजय राऊत

संजय राऊत हे बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे वक्तव्य केले.

संबंधित बातम्या:

औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की; संजय राऊतांचा ठाम पवित्रा

आता होळकरांच्या वंशजांचीही शरद पवारांवर टीका, छत्रपती संभाजीराजेंनाही पाठवला संदेश

(Change Ahmednagar name demand by Ahilyadevi holkar descendants)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.