दिवाळीलाच “या” शहरात ठंडा ठंडा कुल कुल…मान्सून माघारी फिरताच हवेत गारवा…
महाबळेश्वर नंतर राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिकची ओळख झाली असून नाशिकची गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
Nashik News : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात (Temperature) मोठे बदल झाले आहे. त्यानुसार पावसाळा देखील लांबला होता. त्यात आता दिवाळी सुरू झालेली असतांनाच शहरातील (Nashik) वातावरणात मोठा बदल झाला आहे. खरंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा ऐवजी नागरिकांना अतिवृष्टीचाच अधिक सामना करावा लागला आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेत परिसरात अजूनही ओलावा आहे. मात्र, उत्तरेकडील राज्यात वातावरण बदललेले असतांना आता महाराष्ट्रातील वातावरण बदलू लागले आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. मात्र, त्याहूनही अधिकची थंडी नाशिकमध्ये नागरिकांना अनुभवयाला मिळत असते. त्यात काश्मीर मध्ये महिनाभर अगोदर हिमवृष्टीला सुरुवात झाली असल्याने देशातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे.
महाबळेश्वर नंतर राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिकची ओळख झाली असून नाशिकची गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
यंदाच्या वर्षी हाच गारवा दिवाळीच सुरू झाला आहे, यंदाच्या वर्षी पावसाळा लांबल्याने हिवाळा देखील लांबेल अशी स्थिती होती, मात्र तसे न होता महिनाभर आधीच थंडीने नाशकात शिरकाव केला आहे.
यंदाच्या वर्षी नाशिक शहरातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात असतांना सोमवारी शहरातील तापमानाची नोंद 14.5 अंश सेल्सिअस केली गेली आहे.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने छोट्या-मोठ्या अजूनही तुडुंब भरलेल्या आहेत, तलाव आणि धरणे देखील फुल्ल भरलेली आहेत.
उत्तर भारतातही थंडी जाणवू लागली आहे. महाराष्ट्रात देखील थंडीचा कालावधी अधिक आणि कडाक्याची राहण्याची शक्यता आहे.