एल्गार परिषद प्रकरणी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?
पुणे : बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशियितांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात 5160 पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. यावेळी 80 जणांचे जबाब नोंदवून न्यायालयात सादर केलंय. एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचं दोषारोपपत्रात दिसून येत आहे. विशेष […]
पुणे : बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशियितांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात 5160 पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. यावेळी 80 जणांचे जबाब नोंदवून न्यायालयात सादर केलंय. एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचं दोषारोपपत्रात दिसून येत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आणि लोकशाही शासन व्यवस्था आणि नागरिक यांच्याविरोधात युद्ध पुकारण्यासाठी अवैध शस्त्र आणि दारूगोळा मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं आहे.
रोना विल्सन, अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ.दिपु, कॉ. मंगलु यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
पुणे शहरात शनिवारवाडा प्रांगणात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली. या परिषदेसाठी चार ते पाच महिने सुरु असलेली पूर्वतयारी आणि परिषदेत झालेली भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला. त्या हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे दोषारोपपत्रात नमूद केलंय.
पोलिसांनी आरोपींवर भादंवी कलम 153 (अ), 505 (1) (ब), 120 (1), 121, 121 (अ), 124 (अ), 34, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा 1967 सुधारित अधिनियम 2012 कलम 13, 16,17,18,18 (ब), 20, 38, 39, 40 ही कलमे लावण्यात आली आहे.
पाच आरोपींना सहा जून 2018 रोजी सुरुवातीला अटक करण्यात आली. सीपीआय माओवादी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या माध्यमातून एल्गार परिषदेचे आयोजन, कार्यक्रमाचा प्रचार, आर्थिक निधीची मदत, प्रेरणा, दिशादर्शन आरोपींनी भूमिगत असलेल्या माओवादी नेत्यांसोबत आयोजित करुन त्याची अंमलबजावणी केली होती.
एल्गार परिषदेच्या अनुषंगाने कोरेगाव भीमा शौर्य प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला. त्यानंतर कोरेगाव भीमा याठिकाणी दुसऱ्या दिवशी हिंसाचाराची दाहकता वाढली गेली. छत्तीसगडमध्ये शरण आलेला गडचिरोलीतील वरिष्ठ माओवादी नेता पहाडसिंग याचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये त्याने भूमिगत नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे हा देशभरातील शहरी माओवादाचं नेटवर्क जाळं सांभाळत असल्याचं म्हटलंय.
आरोपींची गुन्ह्यातील भूमिका
रोना विल्सन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंर्दभात पुरावे मिळून आले. सीपीआय-एम या संघटनेचा ईस्टन ब्युरो रिजनल सेक्रेटरी किशनदा ऊर्फ प्रशांत बोस याच्यासोबत रोना विल्सन याचे ईमेल द्वारे झालेले संभाषण पोलिसांना मिळाले. बंदी घालण्यात आलेल्या संघटनेला दारुगोळा आणि शस्त्रसाठा पुरवण्यात मुख्य भूमिका त्याने बजावली.
अॅड. सुरेंद्र गडलिंग – सीपीआय माओवादी संघटनेशी संबंधित विविध कृत्यात सहभाग, नक्षलवादी कारवायांसाठी आर्थिक निधीची तरतूद, भूमिगत नेत्यांसोबत संर्पक करुन शहरी नक्षलवादी कारवायाची अंमलबजावणी.
प्रा. शोमा सेन – सीपीआय-एमद्वारे बेकायदेशीर कृत्य सुरु ठेवले, संदेशांची देवाणघेवाण, बैठकींचे आयोजन यात महत्वाची भूमिका, अनुराधा गंडी मेमोरियल ट्रस्टमार्फत बेकायदेशीर पद्धतीने गुप्तपणे कारवाया
महेश राऊत – सीपीआय माओवादी या संघटनेत नवीन तरुणांची भरती करणे, आर्थिक निधीची उभारणी, पैशांची देवाण-घेवाण, भरती केलेल्या सदस्यांचे दुर्गम भागात प्रशिक्षण.
सुधीर ढवळे – एल्गार परिषदेच्या आयोजनात प्रमुख भूमिका, परिषदेच्या आयोजनाकरिता निधीची उपलब्धता, माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य