चर्चा तर होणारचः मालेगावमध्ये काँग्रेसला पाडलेल्या खिंडारानंतर भुजबळ हसून म्हणतायत की…!

पालकमंत्री भुजबळांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मालेगावमध्ये कोरोना कसा रोखला गेला, याचे शास्त्रीय कारण शोधले जात आहे.

चर्चा तर होणारचः मालेगावमध्ये काँग्रेसला पाडलेल्या खिंडारानंतर भुजबळ हसून म्हणतायत की...!
Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 10:17 AM

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपलाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) जोरदार दणका देत मालेगावमध्ये (Malegaon) खिंडार पाडले. तब्बल 27 नगरसेवकांनी येथे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, ते उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याच अनुषंगाने आज प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी दिलेले उत्तर खूप काही सूचक होते.

भुजबळ काय म्हणाले?

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी वीरमाता आणि वीरपत्नींची भेट घेतली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वीरमाता आणि पत्नींना जमिनीचे वितरणही करण्यात आले. ग्रामीण पोलीस दलात 4 नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यांनाही भुजबळ यांनी झेंडा दाखवला. या कार्यक्रमानंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अपेक्षेप्रमाणे मालेगाव येथे राष्ट्रवादीने काँग्रेसला पाडलेल्या खिंडाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा भुजबळ यांनी सुरुवातीला मौन बाळगले. मात्र, त्यानंतरही प्रतिक्रिया विचारताच, मिश्किल हसत मला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

मालेगावचे कारण शोधणे सुरू…

पालकमंत्री भुजबळांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, सध्या नाशिकचे दीडशेवे वर्ष साजरे होत आहे. मात्र, कोरोनाचे सावट सुरूय. महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन कार्यक्रम सुरू केला. शहरी भागात 45 तर ग्रामीण भागात 45 केंद्र आहेत. 36 कोटी 42 लाखांचे अनुदान कोरोना काळातील मृतांच्या नातेवाईकांना दिले. मालेगावमध्ये कोरोना कसा रोखला गेला, याचे शास्त्रीय कारण शोधले जात आहे. पोलीस आयुक्तांनी शहरात नो हेल्मेट – नो पेट्रोल मोहीम यशस्वीपणे राबवली. महापालिकेच्या वतीने स्मार्ट स्कूल अभियान सुरू आहे. नमामी गोदा मोहिमेच्या माध्यमातून गोदा स्वच्छतेचा उपक्रम सुरूय. शहरात वैद्यकीय यंत्रणा बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. लोकहीतवादी मंडळाने साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवले, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, त्यांनी मालेगाव पक्षांतरावर हसून एका वाक्यात दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.