नाथाभाऊंचं राष्ट्रवादीत स्वागत, त्यांचा पक्षाला फायदा होईल: छगन भुजबळ

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयाचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केलं आहे.

नाथाभाऊंचं राष्ट्रवादीत स्वागत, त्यांचा पक्षाला फायदा होईल: छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:59 PM

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची निश्चित ताकद वाढेल, असं भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal On Eknath Khadase Decision Join NCp)

“एकनाथ खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत. त्यांनी भाजपला महाराष्ट्रात मोठे केले. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते. असे व्यक्तिमत्त्व जर पक्षात आले तर निश्चितपणे पक्षाची ताकद वाढेल”, असा विश्वास देखील श्री भुजबळ यांनी व्यक्त केला.

“एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्या वेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. ही गोष्ट शरद पवार साहेबांना कळते. त्यामुळे आम्ही सर्व जण नाथाभाऊंचे स्वागतच करतो”, असं भुजबळ म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी जर त्यांच्या भूमिकेत बदल केला असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्यांना पटली असेल तर त्यांचे स्वागतच करावे लागेल. त्यांच्यामुळे पक्षाला अधिक फायदा होणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल- जयंत पाटील

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल, असं जयंत पाटील म्हणाले. खडसेंनी भाजपचा त्याग केल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे राष्ट्रवादीचं बळ वाढेल. एक अनेक वर्षांचा अनुभवी नेता अनेक प्रश्नांशी मुद्द्यांवर काम करुन, महाराष्ट्राची जाण असणार नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यांचं स्वागतं, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द

1980 मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, 1987 मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

(Chhagan Bhujbal On Eknath Khadase Decision Join NCp)

संबंधित बातम्या 

Eknath Khadse | पहिल्या निवडणुकीत पराभव ते 30 वर्ष मुक्ताईनगरवर अधिराज्य, एकनाथ खडसेंची कारकीर्द

कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.