जाहीर कार्यक्रमात छगन भुजबळांना कुणाची आठवण आली ? सांगितला किस्सा…
भुजबळ म्हणाले, सामाजिक आणि राजकीय जीवनात जे लोक वावरतात त्यांचे मित्रापेक्षा शत्रू जास्त असतात, म्हणून त्यांना सुरक्षा दिली जाते.
नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याबद्दलचा त्यांनी एक किस्सा सांगत विरोधात असतांना सुद्धा मला कशी सुरक्षा देण्यात आली होती, ती कुणी दिली होती याबाबतची आठवण देखील जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. साडेतीन महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाले, त्यानंतर अनेक माजी मंत्र्यांना शिंदे सरकारने सुरक्षा कायम ठेवली होती, मात्र त्यानंतर नुकताच शिंदे सरकारने माजी मंत्र्यांच्या सुरक्षा काढून घेतल्या आहेत. त्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याही नावाचा समावेश आहे. याबाबत सुरक्षा गेल्यानंतर भुजबळ यांनी घडलेला प्रसंग जाहीर कार्यक्रमात सांगितला आहे. दिवस येतात, जातात आमच्यावरही संकट येतात आम्ही संयमाने घेतो पण आता आमची सिक्युरिटी काढली, सकाळी विचारले पोलीस कुठे तर गेले म्हणे असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान छगन भुजबळ यांची सुरक्षा काढल्यानंतर भुजबळ यांनी घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर मला गोपीनाथ मुंढेनी सुरक्षा दिली होती अशीही आठवण भुजबळ यांनी सांगितली.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील रानवड येथील साखर कारखान्याच्या कार्यक्रमाप्रसंगी छगन भुजबळ यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांची आठवण काढली.
भुजबळ पुढे म्हणाले, सामाजिक आणि राजकीय जीवनात जे लोक वावरतात त्यांचे मित्रापेक्षा शत्रू जास्त असतात, म्हणून त्यांना सुरक्षा दिली जाते.
बदल होणारच, थोडे दिवस जातात पण महाराष्ट्र कधी झुकणार नाही असं म्हणत भुजबळ यांची सुरक्षा काढल्यानंतर भुजबळांनी पहिल्यांदाच असा खुलासा केला आहे.
माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी मला सुरक्षा देण्यात आली होती, ती सुरक्षा गोपीनाथ मुंढे यांनी दिली होती असे सांगत भर कार्यक्रमात भुजबळांना मुंढे यांची आठवण झाली होती.