आता जूनपासून केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार; छगन भुजबळांची घोषणा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी 1 जूनपासून सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ केशरी कार्ड धारकांना देणार असल्याचं म्हटलं आहे. Chhagan Bhujbal food grain distribution

आता जूनपासून केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार; छगन भुजबळांची घोषणा
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 5:28 PM

नाशिक: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जून मध्ये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन निर्बंध लागू करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. (Chhagan Bhujbal said food distribution in fare price will started from june for Kesari Raition Card holders )

केशरी कार्ड धारकांना जूनपासून सवलतीच्या दरात धान्य

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच राज्य सरकारने अन्न धान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मागच्या लॅाकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जुनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अन्नधान्यांचे राज्यात मोफत वितरण चालू आहे. त्याचबरोबर आता एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जुन महिन्यात प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील 71 लाख 54 हजार 738 एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांचं नरेंद्र मोदींना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना 3 किलो गहू, आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं एक पत्र समोर आलं होतं. गेल्या वर्षी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ महाराष्ट्रात यशस्वी ठरल्याचं भुजबळांनी आपल्या पत्रात म्हटलंय. तसंच महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेत मदतीचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती.

संबंधित बातम्या: शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्याला 100 टक्के केंद्र सरकार जबाबदार, भुजबळांचा घणाघात

गरीब आणि मजूरांना शिवभोजनचा मोठा आधार, 3 कोटी नागरिकांकडून आस्वाद : छगन भुजबळ

(Chhagan Bhujbal said food distribution in fare price will started from june for Kesari Raition Card holders )

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.