Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी पवारांना कसली आठवण करून दिली ? भेटीत काय घडलं ?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आज (सोमवार) सकाळीच शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची बातमी येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भुजबळ-पवार यांच्या या भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी पवारांना कसली आठवण करून दिली ? भेटीत काय घडलं ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 1:57 PM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आज (सोमवार) सकाळीच शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची बातमी येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भुजबळ-पवार यांच्या या भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या. अखेर पवारांच्या भेटीत काय बोलणं झालं, ही भेट नेमकी का झाली या सर्व प्रश्नांची उकल खुद्द छगन भुजबळ यांनीच केली. आजची भेट ही राजकारणाच्या मुद्यावर झाली नाही, मी मंत्री म्हणून गेलो नव्हतो , कोणतीही पक्षीय भूमिकाही नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. ‘राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे.’ याची आठवण पवार साहेबांना भेटीत करून दिली, असं भुजबळांनी सांगितलं.

काय म्हणाले भुजबळ ?

ज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे. त्यांना आठवण करून दिली. बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देताना असाच मराठवाडा पेटला होता. तेव्हा मराठवाडा शांत करून तुम्ही निर्णय घेतला. सरकारचं काय होईल ते होईल आपण हे काम केलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही बाबासाहेबांचं नाव जोडलं. आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही आलाच नाही.

मुख्यमंत्री जरांगेंना भेटले काय चर्चा केली. काय आश्वासने दिली हे आम्हाला माहीत नाही, असं पवार म्हणाले. तुम्ही हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सोडवायला गेला तुम्ही त्यांना काय सांगितलं माहीत नाही, असं शरद पवार मला म्हणाले.

चर्चा करून मार्ग काढू

आम्ही काही हाके आणि उपोषण करणाऱ्यांना उपोषण सोडायला सांगितलं. उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होणार नाही. चर्चा करून मार्ग काढू एवढंच आम्ही सांगितलं. तसेच जरांगेंना जे मंत्री भेटले त्यांनी त्यांना काय सांगितलं हे मला माहीत नाही, ते तुम्ही विचारलं पाहिजे, असं मी शरद पवार यांना म्हणालो. मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही आज राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. सर्व समाज घटकांची गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा तुमचा अभ्यास आहे. आम्ही मुख्यमंत्री झालो, मंत्री झालो म्हणजे याचा आम्हाला अभ्यास आहे असं समजण्याचं कारण नाही. त्यामुळे तुम्ही यात पुढाकार घेतला पाहिजे.

ते म्हणाले, बरोबर आहे. आम्ही आलो नाही कारण तुमची काय चर्चा झाली माहीत नाही. आणि ५० लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते? मी म्हटलं ठिक आहे. तुम्ही बोलवा लोकांना आम्ही येतो. त्यांनी विचारलं कुणाचं काय मतं आहे सर्व पक्षांचं ते सांगा. ते म्हणाले, एक दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलतो. आम्ही दोन चार लोकं आहोत, जी पाहिजे ती एकत्र बसतो आणि काय होतंय काय झालं आणि करायला पाहिजे. परिस्थिती काय आहे. यावर मी चर्चा करायला तयार आहे. सध्या माझी तब्येत बरी नाही, परंतु मी दोन दिवसात बोलतो, असं पवार म्हणाले.

वातावरण शांत राहावं हा माझा हेतू आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही. पवार म्हणाले, मीडियाला सांगा राजकारण आणणार नाही. केवळ सामाजिक प्रश्न म्हणून दोन चार लोकांबरोबर चर्चा करू. दीड तास चर्चा झाली. कुठे काय काय झालं हे सांगितलं. वकील काय म्हणतात ते सांगितलं. धनगरांच्या प्रश्नावरही चर्चा केली. त्यांनी काही सूचना दिल्या. साधकबाधक चर्चा झाली. पवार चर्चेला तयार आहे. ओपनमध्ये चर्चा होणं कठिण आहे. त्यामुळे दोन चार लोकांमध्ये चर्चा करणार. प्रश्न सुटण्याआधी अवघड होतात. म्हणून आम्ही आधीच समजून घेतो असं पवार म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.