Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरसकट… सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध, छगन भुजबळ कडाडले

मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही. परंतू ते ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यायला हवे. सरसकट कुणबी आरक्षण देण्याला आपला स्पष्टपणे विरोध असल्याची भूमिका सरकारमधील सहभागी मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

सरसकट... सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध, छगन भुजबळ कडाडले
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 6:26 PM

मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटून सरसकट आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध असल्याचे सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट करीत सरकारलाच आहेर दिला आहे. मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही. परंतू ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्यावे. अशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करून मराठ्यांना जर आरक्षण वाटले तर ओबीसींचे आरक्षण नष्ट होऊन जाईल. जशी मराठ्यांची मते हवी आहेत तर ओबीसींची मतेही महत्वाची आहेत. ती नको आहेत का ? असाही सवाल करीत ओबीसी गुपचुप आहे, गरीब आहे म्हणून त्यांना काय समजत नाही असे समजू नका अशा शब्दात भुजबळ यांनी सरकारची कोंडी केली आहे.

मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही. परंतू ते ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यायला हवे. निजामशाहीत कुणबी वंशावळ काढून आधी कुणबी पाच हजार आहेत असे सांगितले गेले. आधी ओबीसीच्या 250 जाती होत्या. नंतर त्यात वाढ झाली आहे. परंतू सरकारने दोन दिवसांत ऑफीस थाटून कुणबी सर्टीफिकेट्स वाटायलाच सुरुवात केली आहे. इतरांना सर्टीफीकेट्स मिळायला वर्षभर लागते. यांना तर कुणबी सर्टीफीकेट राजरोस वाटले जात आहेत, त्यामुळे नोकरीत आरक्षण मिळणार आहे, राजकीय आरक्षण मिळणार आहे. इतरांना 1950 पूर्वीचे पुरावे मागितले जात आहेत. वंशावळीत एकाला सर्टीफीकेट मिळाले तर सर्व नातेवाइकांना आरक्षण लागू होणार आहे तर ओबीसी आरक्षण राहील का ? असाही सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

ओबीसींची जनगणना कराच ?

बिहारात जातगणना झाली तेथे 63 टक्के ओबीसी निघाले. येथे ही जातगणना होऊ द्या. लोकांना कळू दे किती आहेत ओबीसी. नेहमी ओबीसीच्या संख्येवरून प्रश्न करणाऱ्यांना कळू दे खरी संख्या किती ते असेही भुजबळ यावेळी म्हणाले. माळी आहेत म्हणून आमदाराची घरे जाळता. काय बोलले होते ते प्रकाश सोळंकी ? हे बरोबर नाही. सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहीजे. तुम्हाला ओबीसींची मते नको का ? ओबीसींमध्ये 375 जाती आहेत. सुतार, लोहार, वंजारी, धनगर अशा अनेक जाती 12 बुलतेदार आहेत. त्यांची मते सरकारला नको आहेत का? असाही सवाल भुजबळ यांनी केला आहे.

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.