Chhagan Bhujbal | पतंग वाचवता-वाचवता थकलोय, माझ्याच पतंगावर सगळ्यांचा डोळा; भुजबळांची खंत काय?
येवल्यात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात पंतग उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद घेतला.
येवलाः माझ्याच पंतगावर सगळ्यांचं लक्ष आहे. तो वाचवता-वाचवता मी थकलोय, अशी खंतवजा प्रतिक्रिया शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. भुजबळ नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये आले असता त्यांनी पतंगबाजीचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर माध्यमांशी व्यक्त होताना ही खंत व्यक्त केली. अंजली दमानिया (Anjali Damania) पुन्हा न्यायालयात गेल्या आहेत, याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, त्याबाबत एवढी काळजी करत नाही. न्यायालयाने आम्हाला केसमधून डिस्चार्ज केलंय, अशी टिपण्णीही त्यांनी व्यक्त केली.
पतंग उत्सव साजरा
येवल्यात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात पंतग उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी उत्सव साजरा करत असताना नागरिकांनी कोरोनाबाबत अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मोहन शेलार, वसंत पवार, दीपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर इत्यादी उपस्थित होते.
अनेकांच्या पतंगी कापल्या…
सध्या आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया भुजबळांविरोधात पुन्हा न्यायालयात गेल्या आहेत. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, त्याबाबत एवढी काळजी करत नाही. न्यायालयाने आम्हाला केसमधून डिस्चार्ज केलं आहे. अनेकांचेतंग कापले गेले आहेत. आता तुम्ही कोणाची पतंग कापणार असा प्रश्न विचारला असता भुजबळ भुजबळ म्हणाले की, माझीच पतंग प्रत्येक जण कापण्यासाठी तयार असून, मी कोणाचा पतंग कापण्याचा धंदा करत नाही आणि माझ्याच पतंगावर सगळ्यांचं लक्ष असतं आणि मी माझी पतंग वाचवता-वाचताच थकलो आहे, अशी खंतही व्यक्त केली.
सफाई काम महत्त्वाचे
येवला नगरपालिकेत स्वच्छ भारत मिशन – स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हॅडकार्टचे वितरण करण्यात आले. यावेळी भुजबळ म्हणाले की, कुठल्याही शहरात साफ सफाईचे काम हे अतिशय महत्वाचे असून, सफाई कामगारांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. कुठल्याही शहरातील नागरिकांनी सफाई कामगारांचे उपकार विसरता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले उपस्थित होते.
इतर बातम्याः
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली