Manoj Jarange Patil : छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; आता तुम्ही…

मराठ्यांच्या नेत्यांना गावबंदी हा जातीयवाद नाही का? पुढारी हा पुढारी असतो. आता तरी मराठा समाजाच्या नेत्यांना जागं व्हावं. शहाणे व्हावं. असे बोर्ड लागत असतील तर आता तरी शहाणे व्हा. भुजबळ जातीयवाद घडवून आणत आहे. भुजबळांनी बोर्ड लावायला सांगितलं आहे. हे भुजबळच घडवून आणत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil : छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; आता तुम्ही...
छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 12:11 PM

मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पुण्याच्या भाषणातून छगन भुजबळ यांनी चिथावणी दिली आहे. तलवारी गंजल्या आहेत. त्या घासून ठेवा असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळांचा हा इशारा गंभीर आहे. याचा अर्थ त्यांना दंगल घडवायची आहे, असा आरोप करतानाच भुजबळांनी कितीही चिथावणी दिली तरी आपण काही करायचं नाही. शांततेत राहायचं. पण तयारीत राहा. त्याने हत्यारे वाटलं तर आपण हातबांधून राहायचं नाही. आपला एकही बळी जाता कामा नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलणारी माणसं पेरली आहेत. त्यांना दंगल घडवायची आहे. भुजबळांच्या पुण्याच्या भाषणातून अनेक अर्थ निघत आहेत. ते चिथावणी देत आहेत. लोकांना दंगलीसाठी उद्ययुक्त करत आहेत. तसा प्रयत्न झाला तर आपण तयार राहावं. तसा प्रयोग झाला तर आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. जशास तसे उत्तर देऊ. माझं गृहमंत्र्यांना सांगणं आहे, या गोष्टींकडे गांभीर्याने पाहा. भुजबळ इशारे देत असेल तर राज्यासाठी गंभीर बाब आहे. राज्यासाठी शांत बाब नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. कडवट मराठे आहोत. उत्तराला उत्तर देणारच, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

लोकं माझंच ऐकतील

मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरूनही मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका केली. भुजबळांना अभ्यास नाही. मी काय म्हटलंय ते सांगा. आम्ही जे सांगतो ते लोकं ऐकतील असं तुम्हाला वाटतं. तुम्ही सांगितलेलं लोकं ऐकणार नाही. मी सांगितलेलंच लोकं ऐकतील. पाशा पटेल मला महिन्याभरापूर्वी भेटले. ते म्हणाले, तुमच्यामुळे मी कुणबी झालो. माझी नोंद सापडली. मग तो मुस्लिम होते का?; असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठे ओबीसीत आहेत हे मान्य करा. या वयात तुम्ही समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका. मुस्लिम समाज ओबीसीत आहे. तो आरक्षणात येणार आहे. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, असंही ते म्हणाले.

शब्दाचा मान राखतो

मंत्री शंभुराज देसाई यांनी दोन्ही समाजाच्या नेत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. 13 तारखेपर्यंत शांत राहा, असं त्यांनी म्हटलंय. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी शंभुराज देसाई यांच्या शब्दांचा मान राखतो. ते म्हणतात म्हणून मी 13 तारखेपर्यंत प्रतिक्रिया देणार नाही. बोलणार नाही. ही माझी शेवटची प्रतिक्रिया आहे. 13 तारखेला आमच्या बाजूने न्याय होईल याची आम्हाला अपेक्षा आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

14 तारखेला पाहू

आमच्या 9 मागण्या मान्य होतील ही अपेक्षा ठेवू. शंभुराज देसाई यांनी शांत राहा म्हटलंय, याचा अर्थ सरकार आपल्या बाजूने सकारात्मक आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता भुजबळ यांनी त्यांच्या लोकांनी काहीही म्हटलं तरी 13 तारखेपर्यंत काही उत्तर देऊ नका. आपल्याला मारहाण केली तरी उत्तर देऊ नका. 14 तारखेला काय करायचं ते पाहू, असं सूचक विधान त्यांनी केलं.

विखे पाटील कधी तरी खरं बोला

यावेळी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रातील सर्व मराठा कुणबी आहेत. काय चुकीचं बोलतो मी? काय खोटं बोललो? सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण पाहा. त्यात कुणबीचा उल्लेख नाही का? मग आम्ही आंदोलन भरकटवलंय कसं म्हणता? राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही कधी तरी खरं बोला. जातीच्या बाजूने तरी बोला. मराठा नेत्यांनी मराठ्यांवर टीका करणं बंद करा, असं आवाहन त्यांनी केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.