MSP | नरेंद्र मोदींची हमीभावाविषयी भूमिका स्वागतार्ह पण आश्वासन देणं आणि कायदा करणं स्वतंत्र गोष्टी, भुजबळांचा टोला
छगन भुजबळ यांनी मोदींच्या भूमिकेचे स्वागत करताना आश्वासन देणं आणि कायदा करणं या स्वतंत्र गोष्टी आहेत, असा टोला लगावला. Chhagan Bhujbal Narendra Modi
नाशिक : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हमीभावाबद्दल मांडलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलताना हमीभाव होता, आहे आणि राहील असं म्हटलं होते. छगन भुजबळ यांनी मोदींच्या भूमिकेचे स्वागत करताना आश्वासन देणं आणि कायदा करणं या स्वतंत्र गोष्टी आहेत, असा टोला लगावला. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Chhagan Bhujbal welcomes Narendra Modi stand on MSP but said need of Act on MSP)
छगन भुजबळ काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभाव होता आणि राहील हे सांगितलं याचं स्वागत आहे. शेतकऱ्यांना तेच हवंय मात्र,आश्वासन देणं आणी कायदा करणं या स्वतंत्र गोष्टी आहेत. केंद्र सरकारनं कृषी कायदे रद्द करून नवा कायदा करावा, असं भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारनं त्यापूर्वी सर्व राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांसोबत चर्चा करावी, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
द्राक्ष निर्यातीवरील अनुदान रद्द झाल्यानं शेतकऱ्यांना फटका
छगन भुजबळ हे नाशिक जिल्हा निधी तरतुदीसाठी आयोजित बैठकीला उपस्थित होते. आदिवासी मंत्रालयानं 298 कोटींची मर्यादा घातली होती. मागण्या जास्त असल्यानं, चर्चेअंती 350 कोटी झाले मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य,अंगणवाडी विकास,अमृत आहार योजना, रस्ते यासाठी तरतूद करण्यात आली. द्राक्ष बागायतदारांना एक्स्पोर्ट सबसिडी रद्द झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. छोट्या शेतकऱ्यांच्या जमीनी, मालमत्ता विकून वसुली करू नका अशा सूचनाही छगन भुजबळ यांनी जिल्हा बँकेला दिल्या आहेत.
किमान आधारभूत किमंतीवर नरेंद्र मोदी काय म्हणाले?
आम्ही, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत. मिळून मिसळून चर्चा करु, वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये. असं मोदी म्हणाले. आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, तुम्हाला लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही. पक्ष-विपक्ष असो, या सुधारणांना आपण संधी द्यायला हवी, या परिवर्तनाने लाभ होतो की नाही हे पाहावं लागेल, काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा करु, आपण काही दरवाजे बंद करत नाहीत. मंडई अधिक प्रतिस्पर्धी होतील, लाभ होईल, MSP होता, आहे आणि राहील. या सभागृहाच्या पवित्र्यातून आम्ही ही ग्वाही देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदीhttps://t.co/VjVANYKf7C#andolanjivi | #NarendraModi | #Parliament | #farmersrprotest | #BJP | @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्याला 100 टक्के केंद्र सरकार जबाबदार, भुजबळांचा घणाघात
कृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी
(Chhagan Bhujbal welcomes Narendra Modi stand on MSP but said need of Act on MSP)