Chhagan Bhujbal | ‘ते’ लगेच गोडसेवादी झाले असे नव्हे, राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष कोण, भुजबळांचं नेमकं उत्तर!

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिला म्हणजे ते लहान किंवा मोठे होतील असे काही नाही. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट म्हणूनच मोठे राहणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हिंदुहृदयसम्राट म्हणून जगात आहेच.

Chhagan Bhujbal | 'ते' लगेच गोडसेवादी झाले असे नव्हे, राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष कोण, भुजबळांचं नेमकं उत्तर!
Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 4:26 PM

लासलगावः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गोष्टींबद्दल सध्या तुफान चर्चा सुरू आहे. त्यातली पहिली म्हणजे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी साकारलेला नथुराम गोडसे आणि दुसरी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक प्रदेशाध्यक्ष कोण. अर्थातच हे दोन्ही प्रश्न येवला येथे आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांना विचारण्यात आले. त्यांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्या अतिशय मुरब्बी अशा शैलीत देत त्यांचा सोक्षमोक्ष लावून टाकला.

काय म्हणाले भुजबळ?

अमोल कोल्हे यांनी केलेला चित्रपट रोखण्यासाठी मोदींना पत्र दिले आहे. त्याबद्दल मंत्री भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, असे वाद वाढवण्याचे विषय असतात. ज्यावेळी पुढे येतात त्यावेळेस अशी मागणी केली जाते. या सगळ्या गोष्टीबाबत डॉ.अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले असून पवार साहेबांनी देखील याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. याचा अर्थ काय ते गोडसेवादी झाले असे होत नाही, असे म्हणत त्यांनी हा विषय संपवला.

रोहित यांचे काम चांगले…

सध्या आर. आर. पाटील यांचे सुपुत्र यांनी नुकतीच केलेल्या राजकीय कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचे नाव राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीही घेतले जात आहे. यावर भुजबळ म्हणाले की, आबा यांचा मुलगा रोहित पाटील यांनी चांगलेच काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे पाहून त्यांच्यावर अधिक जबाबदारी देऊ शकतात. मात्र, प्रदेशाध्यक्ष युवकपदी कोणाला संधी द्यायची हे पवार साहेब ठरवतील व त्याप्रमाणे योग्य त्या व्यक्तीला संधी मिळेल, असे म्हणत भुजबळांनी या विषयाला पूर्णविराम दिला.

बाळासाहेबांना भारतरत्न द्या

नागपूर येथील विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पार्टीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. या मागणीचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, भारतरत्नला शोभेशी अशी ही मागणी असून बाळासाहेब ठाकरे यांनी अथक कष्ट करून शून्यातून हे विश्व निर्माण केले आहे. म्हणून या मागणीचे समर्थन करत आहे. संपूर्ण देशाने याची नोंद घेऊन शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा, असे ते म्हणाले. याबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिला म्हणजे ते लहान किंवा मोठे होतील असे काही नाही. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट म्हणूनच मोठे राहणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हिंदुहृदयसम्राट म्हणून जगात आहेच.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.