छत्रपती संभाजीनगर | 09 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. 23 नोव्हेंबरला हा दौरा संपणार आहे. मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 15 नोव्हेंबर पासून 23 पर्यंत सहा टप्प्यात दौरा होणार आहे. एक डिसेंबर समाजाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू राहील. दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात देशाला आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मारकपासून सुरुवात होणार आहे .तर शेवट शेवगावमध्ये होणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
15 नोव्हेंबर
वाशी, परांडा करमाळा
16 नोव्हेंबर
दौंड, मायनी
17 नोव्हेंबर
सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड
18 नोव्हेंबर
सातारा, वाई, रायगड
19 नोव्हेंबर
रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी
20 नोव्हेंबर
तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा
21 नोव्हेंबर
ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर
22 नोव्हेंबर
विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर
23 नोव्हेंबर
नेवासा, शेवगाव, बोधगाव
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पुढच्या टप्प्यातील दौऱ्याचीही घोषणा केली आहे. विदर्भ, उर्वरित मराठवाडा, कोकण असा पुढचा महाराष्ट्र दौऱ्याचा टप्पा असेल, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
राजकारणी , नेते, अधिकार, डॉक्टर सगळ्यांसाठी माहिती दौऱ्यात पैसे घेतले जात नाही. कोणी मागितले तर देऊ नका.जर दिले असेल तर त्यांच्याकडून माघारी घ्या.जर कुणी चारआणे दिले असेलत परत घ्या ही सगळ्यांना सूचना आहे. जर आम्हाला माहीत झालं पैसे घेत आहे. तर समाज त्याला गैर करणार नाही, माफ करणार नाही. यामुळे आमच्या आंदोलनाला डाग लागणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
कुणबी प्रमाणपत्र वाटपाची गती वाढवा अशी सरकारला विनंती आहे. जगात 50 वर्षापूर्वची आंदोलन कसे झाले? त्यांच्या काय चूका झाल्या? काय बरोबर होत? हे लक्षात घेतलं. आंदोलनाला स्वराज्याचा विचार जोडला, यामुळे आंदोलन यशस्वी होतंय. महाराज बरोबर पिळलदर लोक सोबत होते. त्यांनी यश मिळवलं.यामुळे मी जागरूक आणि सावध करत आहे. पोपट मेला याचा काय उत्तर देऊ? त्यांना सांगा पोपटाचा आता वाघ झाला. तो आता पाळायला लागला आहे.पुराव्याच्या अधरे सरसकट प्रमाणपत्र द्या. शिष्टमंडळ वाट बघून मी म्हातारा होत आहे. त्यांना गाडी लागत नाही का ते कळतं नाही. मात्र त्यांनी आजचा शब्द दिले आज ते नक्की येतील, असं म्हणत शिष्टमंडळाच्या भेटीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.