Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग सुकर होणार? छगन भुजबळांनी दिले संकेत, पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
छत्रपती संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. ते अपक्ष रिंगणात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले आहे. संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे, हेही भुजबळांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्याबाबत सकारात्मक आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई : राज्यसभेच्या रज्यातील सहा सदस्यांची मुदत संपत असून, आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी 31 मे पर्यंत उमेदवारी अर्ज धारण करावे लागणार आहेत. 10 जूनला सहा राज्यसभा (Rajya Sabha) सदस्यांची राज्यातून पुन्हा निवड होणार आहे. राज्याील कार्यकाळ संपणाऱ्या सहा जणांमध्ये पियुष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्रबुद्धे, पी चिदम्बरम, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत यांचा समावेश आहे. तर राष्ट्रपती नियुक्त (President Appointed MP) खासदार संभाजीराजे यांचाही कार्यकाळ संपतो आहे. गेल्यावेळी ते थेट राज्यसभेत गेले होते. यावेळी मात्र ते प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा गुरुवारी छत्रपती संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) केलेली आहे. अशा स्थितीत त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळू शकतो, असे विधान राज्याचे अन्न आणि पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ
छत्रपती संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. ते अपक्ष रिंगणात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले आहे. संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे, हेही भुजबळांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्याबाबत सकारात्मक आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
छत्रपती संभाजीराजेंची भूमिका
राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार असल्याने आपण कोणत्याही पक्षात आताही जाणार नाही, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे. मात्र यावेळी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. समाजासाठी काम करण्याचे ध्येय ठेवून ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे मतांचे गणित
गेल्यावेळी राज्यात भाजपाची सत्ता होती, त्यामुळे त्यावेळी तीन भाजपाचे खासदार निवडणून आले होते. यावेळी भाजपाचे संख्याबळ कमी झाले आहे. गेल्यावेळेप्रमाणेच शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीचे एक-एक खासदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपाचे दोन आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचा एक असे तीन खासदार सहज निवडून येतील. सहाव्या जागेसाठी चुरस असेल. अशा स्थितीत भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्णय घएतल्यास संभाजीराजेंचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.
भुजबळांचे संकेत मात्र..
छगन भुजबळांनी हे संकेत दिले असले तरी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे. संभाजीराजेंनी आज स्वराज्य नावाच्या संघटनेचीही घोषणा केली आहे. आगामी काळात या संघटनेच्या माध्यमातून राजकारण करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. अशा स्थितीत छत्रपती संभाजीराजेंच्या खासदारकीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती बळ देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.