अंतरवली सराटी प्रकरणातील आरोपी ऋषीकेश बेद्रेला जामीन मिळाल्यानंतर tv9 वर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

अंतरवली सराटीतील आरोपी ऋषीकेश बेद्रेला जामीन मिळाला आहे. या जामिनानंतर ऋषीकेश बेद्रे याने tv9 वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ऋषीकेश बेद्रे याने नेमकं काय म्हटलं? शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेचा दाखला का दिला? ऋषीकेश बेद्रे याची पहिली प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीवर...

अंतरवली सराटी प्रकरणातील आरोपी ऋषीकेश बेद्रेला जामीन मिळाल्यानंतर tv9 वर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 11:17 AM

दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 19 डिसेंबर 2023 : अंतरवली सराटीतील आरोपी ऋषीकेश बेद्रे याला नुकतंच जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्याने tv9 वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी समाजासाठी 25 दिवस जेलमध्ये राहिलो. समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये राहिलो तरी वाईट वाटणार नाही. मी समाजासाठी गोळ्या खायला तयार आहे. अंतरवलीत लाठीचार्ज झाला. तेव्हा रक्ताने भिजलेल्या आया बहिणींना मी हॉस्पिटलमध्ये दाखल करायला गेलो होतो. मला दगडफेक झालेली माहीत नाही, असं ऋषीकेश बेद्रे याने म्हटलं आहे.

ऋषीकेश बेद्रे याने नेमकं काय म्हटलं?

धुळे सोलापूर हायवेवर जाळपोळ झाली. तेव्हा पोलिसांसोबत उभा होतो. जळपोळीत माझा सहभाग नव्हता. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. पण मी आंदोलनात राजकारण बाहेर ठेऊन सहभागी झालो होतो. त्यामुळे शरद पवारांचा या आंदोलनाशी संबंध नाही, असं ऋषीकेश बेद्रे याने म्हटलं आहे.

मी यापूर्वी राजमाता जिजाऊची बदनामी केल्यामुळे भांडारकर इन्स्टिट्यूट फोडलं होतं. त्या प्रकारणात मी निर्दोष सुटलो आहे. मराठा आरक्षणासाठी मी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेत काळे झेंडे दाखवले होते. हा असा माझा इतिहास आहे, असं ऋषीकेश बेद्रे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. त्यांनी माझं नाव घेतलं नाही. तर काही वाटलं नाही. माझं नाव घ्यावं असं काही नाही. पण मी यापुढेही कायम मराठा समाजासाठी प्रयत्न करत राहणार आहे, असं ऋषीकेश बेद्रेने म्हटलं आहे.

ऋषीकेश बेद्रेला जामीन

ऋषीकेश बेद्रेला अवैध हत्यार प्रकरणातही जमीन मंजूर झाला आहे. आंबडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून काल ऋषीकेश बेद्रेला जमीन मंजूर झाला. ऋषीकेश बेद्रेला पोलिसांवर हल्ला केलेल्या प्रकरणात गुरुवारीच मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर झाला होता. 25 हजारच्या जात मुचलक्यावर ऋषिकेश बेद्रेला आंबडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. बीड आणि जालना जिल्ह्यात मात्र ऋषिकेश बेद्रेला जाण्यास मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठाकडून अगोदर मज्जाव करण्यात आलेला आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.