बाळासाहेबांच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आता टाळ्या वाजवत बसा, उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी केली जहरी टीका…

बाबरी मशीद पाडली त्यावेळेला सर्व हिंदू तिथे होते. तिथे कोणत्याही पक्षाचे बॅनर नव्हते असं म्हणत शिवसेनेच्या आमदाराने संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेबांच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आता टाळ्या वाजवत बसा, उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी केली जहरी टीका...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 4:17 PM

छत्रपती संभाजीनगर : बाबरी मशीद पाडली त्यावेळेला सर्व हिंदू तिथे होते आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी जर ती बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं म्हंटलं होतं असे सांगत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ हे चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहे. याच दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका कोणीही करू शकत नाही म्हणत आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय शिरसाठ म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य वैयक्तिक आहे. कुणाच्या बाजूने आहे असे मला वाटत नाही. पण राम मंदिर उभारणी किंवा बाबरी पाडणे हे आंदोलन सर्व हिंदू धर्मियांचे होते. त्या ठिकाणी कोण्या पक्षाचे बॅनर किंवा झेंडा नव्हता.

जेव्हा बाबरी ढाचा पाडला, त्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी ढाचा पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे. त्या आंदोलनाच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हे गुन्हा दाखल झाला होता.

हे सुद्धा वाचा

आज जे बोलत आहेत की बाळासाहेबांचा अपमान झाला आहे. बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिम्मत या देशांमध्ये कोणाचेही नाही. संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते की तुम्ही त्यांची नाडी धरून गेले होता का त्यावर संजय शिरसाठ यांनी पलटवार केला आहे.

तुमची नाडी शरद पवार नी काढली आहे. तुमची अवस्था आता विना नाड्याच्या पायजमा सारखी झाली आहे. तुम्ही शिवसेनाप्रमुखाच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या, आता टाळ्या वाजवत बसा स्वाभिमानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका असा सज्जड दमही संजय शिरसाठ यांनी दिला आहे.

आज जे बोलत आहेत, त्या आंदोलनामध्ये त्यावेळेस कोणीच नव्हते. त्यांना राम जन्मभूमी आणि कार सेवकांची माहिती सुद्धा नाही. आम्ही दर्शनाला गेलो तर तुमच्या पोटात दुखते. आज आदित्य ठाकरे काय हैदराबादच्या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला गेला काय? असाही टोला संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

परंतु आम्ही असे म्हणत नाहीत आणि टीकाही करत नाहीत. आम्ही काही बोलायला गेलो तर तुम्हाला टोचते. स्वतःचे नाडे कोण घेऊन चालले आहेत त्याच्याकडे बघत नाहीत असे म्हणत संजय राऊत यांच्यावर संजय शिरसाठ नावाने टीका केली आहे.

तुम्हाला शरम वाटली पाहिजे ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाऊ नका म्हणाले, पण तुम्ही गेलात. सगळ्यात मोठे दोषी आणि गुन्हेगार तुम्ही आहात. हेच उद्धव ठाकरे सांगत होते राहुल गांधी आणि शरद पवार चोर आहेत. आता हे काय संत दिसत आहेत का ? त्यांच्या मांडीवर जाऊन बसले तुम्हाला ते काय संत वाटतात का ? असा सवालही शिरसाठ यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत म्हणजे सकाळचा भोंगा असा उल्लेख करत संजय राऊत आता ज्ञानाच्या गोष्टी करतोय. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य केले त्याचे तुम्हाला वाईट वाटत असेल तर तर तुम्ही टाळ्या वाजवत बसा असा टोमणाही शिरसाठ यांनी लगावला आहे.

तुम्ही आम्हाला शिकवू नका राजकारण आम्हालाही करता येते. आम्ही बाळासाहेबांचा अपमान होऊ नये म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला सोडले म्हणून आम्हीही युती आणि उठाव केलेला आहे. सर्व लोक नाव ठेवत असताना आपलं ते बरोबर आहे असं हट्ट करत तुम्ही बाळासाहेबाचे विचारांना पायदळी तुडवत आहात असा आरोपही शिरसाठ यांनी केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.