किडूकमिडूक लोकांना मी उत्तर देत नाही, गद्दार आहे तो म्हणत चंद्रकांत खैरे संतापले, कोणत्या आमदारावर हल्लाबोल
महाविकास आघाडीची जाहीर सभा उद्या छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. त्यावरून शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार हल्लाबोल केला होता त्यावरून चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीची एकत्रित अशी जाहीर सभा राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे पार पडत आहे. या सभेची जोरदार तयारी छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून या सभेच्या स्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे. या दरम्यान माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरून शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसच्या विरोधात ज्या ठिकाणाहून काँग्रेसवर टीका केली होती. तिथेच त्यांच्यासोबत सभा घेण्यावरून डिवचलं होतं.
तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांनी पाहणी करत ही सभा कोणीही अडवू शकत नाही. आता कार्यकर्ते देखील छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामध्ये मराठवाड्याची ही जाहीरसभा पार पडणार आहे. मोठ्या प्रमाणात ही सभा होईल असेही चंद्रकांत खैरे यांनी दावा केला आहे.
यावेळी बोलत असताना संजय शिरसाट हा कोणाच्या लेव्हलचा आहे, तो माझ्या लेव्हलचा नाही. मी त्याच्यावर का बोलू ? असं म्हणत तो किडूकमिडुक आहे अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली होती. इतकंच काय तो गद्दार आहे त्याच्यावर बोलणार नाही असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यांवरून देखील आमदार संजय शिरसाठ यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यालाच प्रत्युत्तर देत असताना चंद्रकांत खैरे यांनी भारतरत्न चा मुद्दा उपस्थित केला आहे.
वीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी मोदीजींच्या समोर मी स्वतः केली होती असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतरत्न च्या मागणीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करून भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
उद्या होणारा सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागलेलं असताना त्याची जोरदार तयारी महाविकास आघाडीच्या वतीने केली जात आहे त्याच दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी पाहणी करत असताना भाजपा सह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.