बहुजनांना एका छताखाली आणण्यासाठी संभाजीराजेंकडून छत्रपती-होळकर विवाहाचा दाखला

खासदार छत्रपती संभाजीराजेंनी जेजुरीत बहुजनांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं.

बहुजनांना एका छताखाली आणण्यासाठी संभाजीराजेंकडून छत्रपती-होळकर विवाहाचा दाखला
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 8:29 PM

पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजेंनी जेजुरीत बहुजनांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. त्यांनी यावेळी राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या जातीय द्वेषाच्या वातावरणावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच छत्रपती-शाहू विवाहाचा दाखला देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. ते जेजुरीत अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं उद्धाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अहिल्याबाई यांच्या कामाची माहिती देत शाहू आणि होळकर कुटुंबाच्या वेगळ्या नात्याविषयी माहिती दिली (Chhatrapati Sambhajiraje comment on first inter caste marriage of Maharashtra in Shahu and Holkar Family).

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “आज अतिशय अविस्मरणीय दिवस आहे. अहिल्याबाई होळकर यांनी एक वेगळा संदेश दिला. त्यांनी सतीची परंपरा मोडून महिलांचं सबलीकरण केलं. खऱ्या अर्थाने भारताची संस्कृती जपण्याचं काम अहिल्याबाई होळकर यांनी केलं. कोल्हापूरच्या छत्रपतीचं आणि होळकर घराण्याचं नातं फार वेगळं आहे. महाराष्ट्रात पहिला आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी लावला. त्यांनी आपल्या बहिणीचा विवाह होळकर कुटुंबात केला. त्यामुळे मराठा आणि धनगर समाजाचं नातं वेगळं आहे.”

यावेळी त्यांनी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याकडे मी आदर्श म्हणून पाहतो, असंही नमूद केलं.

“बहुजन समाजाला एका छताखाली आणलं पाहिजे”

“आज जातीय विषमता निर्माण झालीय. ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. बहुजन समाजाला एका छताखाली आणलं पाहिजे. सगळ्या महापुरुषांचा विचार एकच आहे. पुढे जायचं असेल तर जातीय विषमता नष्ट व्हायला हवी. माझं सामाजिक कार्य धनगर समाजातून सुरु झालं. माझा पहिला खासदार निधी मी धनगर समाजाचं वास्तव्य असलेल्या भागाला दिला. आपण सर्वजण मिळून बहुजन समाजासाठी काम करु,” असंही संभाजीराजे म्हणाले.

‘महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा जेजुरीत’

या कार्यक्रमात बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा जेजुरीत झालाय. अहिल्याबाई होळकर यांनी देशातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला. भक्तनिवासांची उभारणी केली. समाजासाठी दानधर्म केला. कालची घटना शरमेने मान खाली घालणारी आहे. ज्या मल्हारी मार्तंडाच्या पहिल्या पायरीवर नमन करायला येतो त्या पायरीवर कुणीही राजकारण केलं नाही. पुतळ्याचं राजकारण होतं हे दुर्दैव. शिक्षण संस्थाद्वारे शाळा उभ्या करुन शिक्षणाचं काम केलं जातंय. मात्र, चुकीच्या गोष्टी समोर आणल्या जातात याचा निषेध केलाच पाहिजे.”

‘देवदेवतांबाबत राजकारणाच्या गोष्टी पायरीखाली ठेवा’

“देवदेवतांच्या बाबत राजकारणाच्या गोष्टी पायरीखाली ठेवल्या पाहिजेत. ज्या गोष्टी नविन पिढीला समजल्या पाहिजेत, त्या टाळल्या जात आहेत. शरद पवार यांनी केलेल्या कामाची पुरंदरकरांना जाण आहे. शरद पवारांनी मोठं काम उभं केलं. पुरंदरची जनता त्यांच्यासोबत आहे,” असंही संजय जगताप म्हणाले.

यावेळी युवराज यशवंतरावराजे होळकर म्हणाले, “होळकर राजघराण्यासाठी आजचा दिवस सन्मानाचा आहे. अहिल्याबाई होळकर केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श होत्या. अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा पाहून भाविक त्यांच्या जाज्वल्य कार्याची आठवण ठेवतील. अहिल्याबाई बुद्धी आणि प्रामाणिकपणामुळे राणी बनल्या.”

हेही वाचा :

कन्फ्युजन का? आम्हाला ओबीसीतून नको, आमचंच आरक्षण द्या, संभाजीराजेंचं वडेट्टीवारांना उत्तर

“मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी”

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं ‘ते’ वक्तव्य पटलं नाही; संभाजीराजेंची नाराजी

व्हिडीओ पाहा :

Chhatrapati Sambhajiraje comment on first inter caste marriage of Maharashtra in Shahu and Holkar Family

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.