Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार-गडकरींच्या जागी मी असतो तर शिवरायांचा अपमान झाल्यावर मी पदवीच घेतली नसती-उदयनराजे

उदयनराजे भोंसले यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. वाचा...

पवार-गडकरींच्या जागी मी असतो तर शिवरायांचा अपमान झाल्यावर मी पदवीच घेतली नसती-उदयनराजे
उदयनराजे भोसले Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 3:35 PM

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नितीन गडकरी यांना औरंगाबादच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जी पदवी देण्यात आली, त्या ठिकाणी मी असतो तर मी ती पदवी घेतलीच नसती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान केला. तरीही तिथं कुणी काही बोललं नाही.याच कार्यक्रमात त्यांच्या विधानाचा निषेध करायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. याचं वाईट वाटतं, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

सर्वधर्म जातीच्या लोकांना एक ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही, नाहीतर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. शिवाजी महाराजांनी त्यांचे कुटुंब मानले नाही तर देशाला त्यांनी कुटुंब मानलं आहे. शिवाजी महाराजांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. शिवाजी महाराजांनी।नेहमी रयतेचं राज्य मानलं. त्यांनी स्वतःचे राज्य कधीच मानले नाही. त्यांनी कधीही मीपणाला थारा दिला नाही. मी म्हणजे समाज असं ते मानायचे. मात्र आता सगळ्या गोष्टी व्यक्ती केंद्रित झाल्या आहेत, असं उदयनराजे म्हणालेत.

शिवाजी महाराज सर्वांचे प्रेरणास्थान आहेत.त्यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कुणी काहीही बोललं तर खपवून घेणार आहे, असं उदयनराजे म्हणालेत.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.