देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे पाहून हात जोडले; म्हणाले, कृपया…

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, विधानसभेत बोलताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे पाहून हात जोडले; म्हणाले, कृपया...
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 4:04 PM

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज सभागृहात बोलताना  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. निवडणूक जिंकण्यासाठी व्होट जिहाद करता. एक व्यक्ती येतो 17 मागण्या करतो. तुम्ही त्या वाचतही नाही. तुमच्या देशभक्तीवर माझा संशय नाही. आपण वैचारिक विरोधक आहोत. पण विरोधक आपल्या खांद्यावर कुणाला तरी बंदूक ठेवायला देतात, याचं वाईट वाटतं. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

निवडणूक जिंकण्यासाठी व्होट जिहाद करता. एक व्यक्ती येतो 17 मागण्या करतो. तुम्ही त्या वाचतही नाही. तुमच्या देशभक्तीवर माझा संशय नाही. आपण वैचारिक विरोधक आहोत. पण विरोधक आपल्या खांद्यावर कुणाला तरी बंदूक ठेवायला देतात, याचं वाईट वाटतं.

भारत जोडो अभियानावर मी बोललो, माझ्यावर टीका केली. मी आज पुराव्यानिशी बोलतो. या अभियानात कोण आहे बघा. या देशात आपण नक्षलवादाच्या विरोधात लढाई पुकारली. नक्षलवाद्याचा संविधान, लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना समांतर सरकार हवं आहे. या नक्षलवाद्यांच्या विरुद्ध मोठी लढाई सुरू झाली. त्यामुळे आम नक्षलवादी संपायला लागले. त्यावेळी हा नक्षलवाद सेफ झोन शोधायला लागला, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की,  आर आर पाटील यांच्या काळात 48 संघटनांची यादी होती,  त्या ग्रामीण आणि शहरी भागात सक्रिय असल्याची नोंद आहे. लोकसभेतही १८ फेब्रुवारी २०१४ रोजी मनमोहन सिंगाचं सरकार असताना 72 फ्रंटल संघटनांची नावे जाहीर करण्यात आली होती.  त्यातील सात महाराष्ट्रातील आहेत. त्या तुमच्या भारत जोडोच्या यादीत आहे. महाराष्ट्राच्या एटीएसने त्यावेळी जी माहिती पाठवली होती. लोकसभेत गेलेली ही माहिती आहे, ती माझ्याकडे आहे. त्यात एकूण ४० संघटनांची नावे आहेत. त्यातील १३ संघटना भारत जोडोत काम करत आहेत. तुमच्या देशभक्तीवर प्रश्न नाही. पण निवडणूक जिंकण्यासाठी आपण कुणाचा वापर करत आहोत. कोण आपला खांदा वापरत आहोत याचा विचार केला पाहिजे.

आपण तिसरी आर्थिक शक्ती होत आहोत. अनेक देशांना आनंद नाहीये. त्या देशांना या देशात कारवाई करायची आहे. हात जोडून विनंती करतो कृपया तुमचा खांदा वापरू देऊ नका. कदाचित आमचाही खांदा वापरण्याचा प्रयत्न करतील. एकदा वाजेपयी म्हणाले होते सरकार येतील जातील. पण हा देश , लोकशाही आणि संविधान राहिलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.