Devendra Fadnavis PC : आता टेस्ट मॅच…, पहिल्याच कॅबिनेटमध्ये फडणवीसांचा अधिकाऱ्यांना सूचक इशारा

आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Devendra Fadnavis PC : आता टेस्ट मॅच..., पहिल्याच कॅबिनेटमध्ये फडणवीसांचा अधिकाऱ्यांना सूचक इशारा
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 8:06 PM

आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज मंत्रालयात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर  देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी नव्या सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. गेले अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तर आता फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर बोलताना ते म्हणाले की जरी आमची पदं बदलले असले तरी कामाची दिशा बदलणार नाही, कामाची दिशा कायम राहणार आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी नव्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. जरी आमची पदं बदलले असले तरी कामाची दिशा बदलणार नाही, कामाची दिशा कायम राहणार आहे, आता कसोटी सामना आहे, असा सूचक इशारा फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये अधिकाऱ्यांना दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, नवं सरकार हे धोरात्मक निर्णय घेणार आहे. नवं सरकार अधिक जोमानं आणि गतीनं काम करणार आहे. आमच्या कामाची दिशा बदणार नाही. दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही तातडीनं पाऊलं उचलणार आहोत. मी जनतेला विश्वास देतो की हे सरकार पूर्णपणे पारदर्शी कारभा करेल. येत्या सात, आठ आणि नऊ तारखेला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. याच अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड करू, 9 तारखेला राज्यपालांना अध्यक्षांच्या निवडीसाठी पत्र देऊ. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा देखील पूर्ण झाली आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.